Esha Deol : हेमा मालिनीच्या लेकीचा मोडला 11 वर्षांचा संसार! 'त्या' पुुस्तकामुळे खळबळ

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ईशा-भरतची इंस्टावर व्हायरल पोस्ट

point

घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर आधीच रंगली होती.

point

ईशा देओलच्या त्या पुस्तकात नेमकं लिहिलंय तरी काय?

Esha Deol Divorced News : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ईशा देओलने (Esha Deol) पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दोघं वेगळे झाल्याच्या बातम्या येत होत्या. सोशल मीडिया युजर्सच्या हे देखील लक्षात आलं होतं की, ईशा आणि भरत बऱ्याच काळापासून कोणत्याही पार्टी किंवा कार्यक्रमात एकत्र दिसत नाहीत. आता या अफवांना दुजोरा देत ​खरोखरच ते वेगळे झाल्याची घोषणा त्यांनी स्वत: केली आहे. हे सर्व दोघांच्या परस्पर संमतीने झाले आहे. (Esha Deol Divorced not able to pay attention to husband bharat-takhtani after giving birth second daughter What She Said in her Book)

ADVERTISEMENT

ईशा-भरतची सोशल मीडिया पोस्ट

घटस्फोट घेण्याबाबत ईशा-भरतने शेअर केलेल्या जॉइंट पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात आम्ही आमच्या दोन्ही मुलींच्या हिताचा विचार केला आहे. त्या दोघी आमच्यासाठी नेहमीच पहिले प्राधान्य असतील. आम्ही तुम्हा सर्वांना आमच्या प्रायव्हसीची काळजी घेण्याची विनंती करतो.'

सोशल मीडियावर आधीच रंगली होती घटस्फोटाची चर्चा 

जानेवारी 2024 मध्ये ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्यातील तुटलेल्या नात्याबद्दल बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये खूप गप्पा रंगल्या होत्या. एका व्हायरल पोस्टमध्ये असे म्हटले होते की, 'या कपलमध्ये सर्व काही ठीक नाही आहे.' यानंतर यूजर्सच्या लक्षात आले की, 2023 मध्ये सुरु झालेल्या फेस्टिव्ह सीझनमध्ये ईशा देओल फक्त तिची आई हेमा मालिनीसोबत दिसली होती. आमिर खानची मुलगी आयरा खानच्या रिसेप्शनमध्येही ईशा आई हेमासोबत आली होती.

हे वाचलं का?

ईशा लहान-मोठ्या कार्यक्रमांना एकटीच अटेंड करताना दिसते. वेगवेगळ्या दिवाळी पार्ट्यांनाही ती एकटीच हजेरी लावते. एवढंच नाही तर हेमा मालिनी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही भरत दिसला नव्हता. यामुळे त्यांच्यात सुरू असलेली खटपट चाहत्यांना जाणवू लागली आणि अफवांना आणखी उत्तेजन मिळाले.

'भरतला वेळ देता येत नव्हता...'- ईशा देओल

अभिनयाव्यतिरिक्त ईशा देओलने 2020 मध्ये 'अम्मा मिया: स्टोरीज, ॲडव्हाइस अँड रेसिपीज फ्रॉम वन मदर टू अदर' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये तिने तिच्या पतीबद्दलही लिहिलं आहे. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर भरतला कसा एकटेपणा जाणवत होता कारण, ती त्याला वेळ देऊ शकत नव्हती. 'भरत चिडचिडा झाला होता, माझ्यावर रागवू लागला होता', असं ईशाने यात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ईशाला लक्षात आली होती चूक

ADVERTISEMENT

42 वर्षीय अभिनेत्रीने पुढे लिहिले की, 'मी माझे पुस्तक लिहिण्यात आणि प्रोडक्शन मीटिंगमध्ये व्यस्त होते. त्यामुळेच तो एकटा पडला असावा.  मला माझी चूक मला लक्षात आली आणि ती मी सुधारली.' पुस्तकात ईशाने याबाबत लिहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT