T-Series : दिव्या खोसला घेणार घटस्फोट? पतीचं आडनाव हटवण्यामागचं कारण काय?
Divya Khosla and Bhushan Kumar Divorce Talks : सध्या भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि दिव्या खोसला (Divya Kumar) यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भूषणचे आडनाव 'कुमार' काढून टाकले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दिव्या खोसलाने का हटवलं आडनाव?
दिव्याने इंस्टावरून अनफॉलो केलं T-series चे अकाउंट
दिव्या खोसला आणि भूषण कुमार यांची रोमँटिक लव्हस्टोरी
Divya Khosla and Bhushan Kumar Divorce Talks : सध्या भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि दिव्या खोसला (Divya Kumar) यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भूषणचे आडनाव 'कुमार' काढून टाकले आहे. तसंच त्यांच्या टी-सीरीज (T-series) कंपनीलाही अनफॉलो केल्याची माहिती आहे. यानंतर त्यांच्या नात्यात काहीतरी धुसपूस सुरू असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. इतकंच नाही तर, घटस्फोटाच्या चर्चेलाही उधाण आलं आहे. (Is Divya Khosla Taking Divorce From Bhushan Kumar know the reason behind why she removed husbands surname from social media)
ADVERTISEMENT
आडनाव हटवण्यामागचं कारण काय?
दिव्या खोसला कुमार असं अभिनेत्रीचं इंस्टाग्राम अकाउंटवर नाव होतं. पण आता तसं नसून फक्त दिव्या खोसला हे नाव तिने ठेवलं आहे. मात्र, भूषणच्या टीमने या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. टी सीरीजच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'दिव्याने ज्योतिषशास्त्रीय मान्यतेमुळे आडनाव काढून टाकले आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता ज्याचा लोकांनी आदर केला पाहिजे.
याशिवाय, दिव्याने तिच्या आडनावामध्ये आणखी एक एस जोडला आहे, त्यामुळे हे सर्व ज्योतिषशास्त्रीय कारणामुळे आहे आणि दुसरे काही नाही.' असं ते म्हणाले. दिव्या आणि भूषण यांच्या लग्नाला 19 वर्षे झाली आहेत आणि दोघांना एक मुलगा आहे ज्यावर त्यांचे खूप प्रेम आहे.
हे वाचलं का?
दिव्या खोसला आणि भूषण कुमार यांची रोमँटिक लव्हस्टोरी
'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिव्या आणि भूषण एकमेकांना भेटले होते. दिव्याला पाहताच भूषण तिच्या प्रेमात पडला होता. दिव्याला माहित होतं की भूषणची टी-सीरीज कंपनी आहे आणि दोघांमध्ये कोणता मॅच नाही, त्यामुळे ती त्याच्यापासून लांबच राहायची.
पण भूषणने दिव्याचं मन जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यानंतर भूषणने दिव्याला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी आमंत्रित केले जिथे अभिनेत्रीचे आई-वडील त्याला भेटले. त्यांना भूषण खूप आवडायचा कारण एवढा मोठा व्यक्ती असूनही त्याचं राहणीमान खूप साधं होतं. हळूहळू दिव्याच्या आईनेही तिला भूषणसोबत लग्न करण्यासाठी मनवायला सुरुवात केली. तोपर्यंत तिलाही भूषण आवडू लागला होता आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT