Jasmin Bhasin : डोळ्यांनी दिसेना, झोपताही येईना; अभिनेत्रीला नेमका कोणता आजार झाला?
Jasmin bhasin News : मला खूप वेदना होत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत मी बरी व्हायला हवे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण तोपर्यंत मला माझ्या डोळ्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे, असे जास्मिन सांगते आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जस्मिन भसीनसोबत नेमकी काय घटना घडली आहे?
जस्मिन नेमका काय आजार झालाय?
येत्या चार-पाच दिवसांत मी बरी व्हायला हवे.
Jasmin Bhasin Carneas Damaged : प्रसिद्ध अभिनेत्री जस्मिन भसीन हा टीव्ही मालिकेतला प्रचंड लोकप्रिय चेहरा आहे. भसीन ही सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांमधे नेहमीच चर्चेत असते. या जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) सोबत आता भयंकर घटना घडली आहे. यामध्ये तिला सध्या डोळ्यावर पट्टी लावून राहावे लागत आहे. त्यामुळे जस्मिन भसीनसोबत नेमकी काय घटना घडली आहे? तिला नेमका काय आजार झालाय? हे जाणून घेऊयात. (jasmin bhasin, unable to see and sleep her carneas get damaged tv actor dis se dil tak fame entertainment news)
ADVERTISEMENT
जस्मिन भसीनने ईटाईम्सशी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमाला मला जायचे होते. या कार्यक्रमाला जाताना मी लेन्स घातले होते. हे लेन्स घातल्यानंतर अचानक माझे डोळे दुखू लागले होते. तरीही मी कार्यक्रमाला जाण्याचे ठरवले होते. पण नंतर वेदना इतक्या वाढल्या की मला काहीच दिसेनासे झाले होते, असे जास्मिन सांगते.
हे ही वाचा : Sharad Pawar: बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story
जास्मिन पुढे म्हणाली, या घटनेनंतर मी लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी यावेळी माझी तपासणी करून कॉर्निया खराब झाल्याची माहिती दिली होती. आणि माझ्या डोळ्यावर पट्टी लावून दिली. या पट्टी लावलेल्या अवस्थेत मुंबईच्या दिशेने निघाले.
हे वाचलं का?
मला खूप वेदना होत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत मी बरी व्हायला हवे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण तोपर्यंत मला माझ्या डोळ्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे.माझ्यासाठा हे अजिबात सोपे नाही, कारण मी पाहू शकत नाही आणि वेदनांमुळे मला झोपायला अडचण येत असल्याचे जास्मिन भसीन सांगते आहे.
हे ही वाचा : Hiraman Khoskar : काँग्रेस आमदार CM शिंदेंना भेटला! म्हणाला, "कुठतरी जावंच लागतं ना?"
दरम्यान जस्मिन भसीन, टशन-ए-इश्क आणि दिल से दिल तक यांसारख्या टीव्ही शोमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. ती आता पंजाबी चित्रपट अरदास सरबत दे भले दी मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता ग्रिप्पी ग्रेवाल देखील आहे. हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT