John Abraham : ''मी मरण विकणार नाही'', जॉन अब्राहम असं का म्हणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

john abraham big statement doesnt endorse paan masala gets  on actors who support bollywood news
जॉन अब्राहम द रनवीर शो या पॉडकास्टशी बोलत होता.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जे फिटनेसबद्दल बोलतात आणि तंबाखूच्या जाहिराती करतात

point

मी स्वतःला अशा कोणत्याही ब्रँडशी जोडलेले नाही

point

मी मृत्यू विकू शकत नाही कारण ते माझ्या तत्त्वात नाही

John Abraham On Paan Masala : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने गुटखा आणि पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. जे लोक फिटनेसबद्दल बोलतात तेच लोक पान मसाल्याच्या जाहिराती करतात,असा टोला नाव न घेता जॉनने अक्षयला लगावला आहे. तसेच अशा जाहिरात करून मी मरण विकणार नाही, असे जॉन अब्राहमने स्पष्ट सांगितले आहे.  john abraham big statement doesnt endorse paan masala gets  on actors who support bollywood news 

ADVERTISEMENT

जॉन अब्राहम द रनवीर शो या पॉडकास्टशी बोलत होता. यावेळी बोलताना गुटखा आणि पान मसाल्याच्या जाहिरातीवर आपले मत व्यक्त केले. मी इतर अभिनेत्यांसारखा नाही आहे, जे फिटनेसबद्दल बोलतात आणि तंबाखूच्या जाहिराती करून पैसै कमावतात, असे जॉन म्हणाला. तसेच जर मी माझे आयुष्य सत्याने जगले तर कदाचित मी काही लोकांसाठी आदर्श बनू शकेन. पण मी माझे खोटे व्यक्तिमत्व सार्वजनिकपणे दाखवून पडद्यामागे वेगळे वागले तर सर्वांनाच कळेल. मग दोन प्रकारच्या प्रतिमा कशाला जगायच्या? तुम्ही जे काही आहात ते व्हा, असा सल्ला जॉनने इतर कलाकारांना दिला. 

हे ही वाचा : Raj Thackeray : ''राज ठाकरेंना सुपारीबाज'' म्हणत मराठ्यांनी भिरकावल्या सुपाऱ्या, बीडमध्ये काय घडलं?

मी स्वतःला अशा कोणत्याही ब्रँडशी जोडलेले नाही जे पान मसाला आणि नंतर माउथ फ्रेशनर्सला सपोर्ट करतात. काही लोक फिटनेसबद्दल बोलतात, पण तेच लोक पान मसाला विकतात आणि त्यांचे समर्थन करतात, असे जॉन म्हणाला आहे. माझे माझ्या सर्व अभिनेत्या मित्रांवर प्रेम आहे आणि मी कोणाचाही अपमान करत नाही, असे देखील जॉन म्हणाला आहे. 

हे वाचलं का?

मी अशा गोष्टींचे समर्थन करत नाही. मी मृत्यू विकू शकत नाही कारण ते माझ्या तत्त्वाच्या विरुद्ध असल्याचे देखील जॉन सांगतो. तंबाखू कंपनीची वार्षिक उलाढाल 45 हजार कोटींची आहे.  याला सरकारही पाठबळ देत आहे, त्यामुळे देशात तंबाखूची विक्री बेकायदेशीर नाही, असे जॉनने सांगितले. अभिनेते तंबाखू नव्हे तर 'वेलची' विकत आहेत, असे म्हणतात, हे मला समजू शकले नाही. तुम्ही मृत्यू विकत आहात. आणि असे बोलून तुम्ही कसे जगू शकता? असा सवाल देखील जॉन अब्राहमने केला. 

हे ही वाचा : Kalyan Crime : आजीच्या पेन्शनसाठी नातेवाईक भिडले, बँकेत रक्ताचा सडा; कल्याण हादरलं!

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT