Raj Thackeray : ''राज ठाकरेंना सुपारीबाज'' म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी भिरकावल्या सुपाऱ्या, काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj thackeray convoy stop udhhav thackeray shiv sena ubt and maratha protester manoj jarange patil maratha reservation
राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले होते.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफा अडवला

point

राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मनसे-शिवसेनेत राडा

point

'सुपारीबाज' आणि 'चले जाव'च्या घोषणा दिल्या

Raj Thackeray convoy stop : योगेश काशीद, बीड :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे संध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले होते. यावेळी मराठा आंदोलक आणि शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा (Raj Thackeray) ताफा अडवत सुपारी फेकून आंदोलन केले आहे. त्याचसोबत ताफ्यासमोर 'सुपारीबाज' आणि 'चले जाव'च्या घोषणा दिल्या आहेत. या घोषनेनंतर मराठा आंदोलक, शिवसैनिक आणि मनसेत तुफान राडा झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. (raj thackeray convoy stop udhhav thackeray shiv sena ubt and maratha protester manoj jarange patil maratha reservation) 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, अशी भूमिका मांडली होती. या भूमिकेनंतर राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंना धाराशीवमध्ये देखील मराठा आंदोलकांनी घेरलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले होते.यावेळी बीडमध्ये पोहोचताच राज ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलक आणि शिवसैनिक यांनी अडवला होता. यावेळी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपारी फेकून निषेध नोंदवण्यात आला होता. त्याचसोबत ताफ्यासमोर 'सुपारीबाज' आणि 'चले जाव'च्या घोषणा दिल्या आहेत. या घोषनेनंतर मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यात तुफान राडा झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरूवात केली होती. 

हे ही वाचा : Udhhav Thackeray : ठाकरेंना मोठा झटका? दिल्ली दौऱ्याची Inside Story

 

राज ठाकरे यांना आता मराठा आंदोलकांनी विरोध करायला सुरूवात केली आहे. आज बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा पोहोचताच मराठा आंदोलकांना आक्रमक पावित्रा घेत त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या भिरकावल्या होत्या. यावेळी मराठा आंदोलकांसोबत ठाकरेची शिवसैनिक देखील होते. तसेच ताफा अडवून मराठा आंदोलकांनी सुपारीबाज, चलेजावच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे आता बीडमध्ये देखील राज ठाकरेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोर जावे लागले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनसेचा ठाकरेंना इशारा

राज ठाकरे यांनी लोकसभेला सुपारी घेऊन बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभेत कुणाची सुपारी घेऊन ते मराठवाड्यात आले आहेत? हे विचारण्यासाठी आम्ही आलो होतो, असे बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान शिवसेनेच्या या आंदोलनानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे सुरुवात तुम्ही केली आहे , आता शेवट आम्ही करू,असा इशारा दिला आहे.

हे ही वाचा : Jaya Bachchan : ''तुमचा टोन चुकीचा'', धनकड आणि जया बच्चन यांच्यात जोरदार खडाजंगी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT