Nawazuddin Siddiqui: नवजुद्दीनने घटस्फोटीत पत्नीसह स्वतःच्या भावाविरुद्धच दाखल केला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला

mumbaitak.web aajtak

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Actor Nawazuddin Siddiqui : भाऊ आणि एक्स पत्नीच्या आरोपांना कंटाळून बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने अखेर त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. नवाजुद्दीनने भाऊ शमसुद्दीन आणि माजी पत्नी अंजना पांडे यांच्याकडे 100 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. नवाजुद्दीनचे वकील सुनील कुमार यांनी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर मानहानीचा खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. Nawaz filed a defamation suit of Rs 100 crore against his brother and ex-wife

 नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा गौप्यस्फोट

नवाजुद्दीनने याचिकेत म्हटले आहे की, त्याचा भाऊ आणि माजी पत्नी यांना कायमचे आवर घालण्यात यावे, जेणेकरून त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे कोणतेही वक्तव्य करू नये. यासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा कोणताही मजकूर शेअर करणे बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्यात यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. आपली बदनामी केल्याबद्दल दोघांनीही लेखी माफी मागावी, अशी मागणी नवाजुद्दीन सिद्दीकीने केली आहे.

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनला सख्ख्या भावाने आईलाही भेटू दिलं नाही, कारण…

भावावर फसवणूक आणि माजी पत्नीला भडकावल्याचा आरोप

याचिकेत म्हटले आहे की 2008 मध्ये जेव्हा त्याचा भाऊ शमसुद्दीनने सांगितले की तो बेरोजगार आहे. नवाजुद्दीनने त्यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. नवाजुद्दीनने आयकर रिटर्न, ऑडिटिंग, जीएसटी फाइलिंग यांसारखी सर्व कामे शमसुद्दीनकडे सोडून स्वत: चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्याने त्याचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, स्वाक्षरी केलेले चेकबुक, बँकेचा पासवर्ड, ईमेल पत्ता आपल्या भावाला दिल्याचे याचिकेत म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फसवणूक, तीन लग्न; नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियावर गंभीर आरोप

नवाजुद्दीनने आरोप केला आहे की, यादरम्यान त्याच्या भावाने अप्रामाणिकपणे पैसे उकळण्यास सुरुवात केली. चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्याला त्यांच्या व्यवहाराबाबत बँकेशी समन्वय साधण्यासाठी वेळ मिळाला नाही. नवाजुद्दीनचे म्हणणे आहे की, एकदा त्याच्या भावाने सांगितले की तो नवाजच्या नावावर मालमत्ता खरेदी करत आहे, तर प्रत्यक्षात ही मालमत्ता संयुक्तपणे खरेदी करण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये यारी रोडवरील फ्लॅट, अर्ध-व्यावसायिक मालमत्ता, बुढाणा शाहपूर येथील फार्महाऊस आणि दुबईतील मालमत्ता यांचा समावेश आहे.

नवाजुद्दीनने सांगितले की, जेव्हा त्याने भाऊ शमसुद्दीनला याबाबत विचारले तेव्हा त्याने आपल्या माजी पत्नीला फूस लावण्यास सुरुवात केली. शमसुद्दीनने अंजनाला नवाजवर खोटे आणि अत्यंत अश्लील आरोप करण्यास प्रवृत्त केले, असे याचिकेत म्हटले आहे.सिद्दिकीने याचिकेत म्हटले आहे की, अंजनाचे माझ्यासोबत लग्न होण्यापूर्वीच लग्न झाले होते, मात्र तिने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगून मला फसवले. पण सत्य समोर आल्यावर मला धक्काच बसला. नवाजुद्दीनने त्याचा भाऊ आणि माजी पत्नीवर २१ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

Nawazuddin Siddiqui वर बलात्काराचा आरोप! पत्नी रडत म्हणाली 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT