Nitesh Bhardwaj: महाभारतातील कृष्णाचा छळ? IAS एक्स पत्नीवर आरोप! मागितली मदत!
Nitesh Bhardwaj: महाभारत या टीव्ही मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांनी त्यांच्या एक्स पत्नी विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेश कॅडरच्या IAS स्मिता भारद्वाज या त्यांच्या एक्स पत्नी आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नितीश भारद्वाज यांनी केलेल्या तक्रारीत नेमकं काय?
पोलीस आयुक्त यासंदर्भात काय म्हणाले?
नितीश यांना महाभारतातून मिळाली होती प्रसिद्धी!
Nitesh Bhardwaj: महाभारत (Mahabharat Serial) या टीव्ही मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज (Actor Nitish Bhardwaj) यांनी त्यांच्या एक्स पत्नी विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेश कॅडरच्या IAS स्मिता भारद्वाज या त्यांच्या एक्स पत्नी आहेत. काही कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. (Nitish Bhardwaj Did FIR Against his IAS ex Wife to Bhopal Police Commissioner)
ADVERTISEMENT
नितीश भारद्वाज यांनी केलेल्या तक्रारीत नेमकं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते नितीश भारद्वाज यांनी भोपाळ पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांना मेल लिहून मदत मागितली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांची एक्स पत्नी त्यांना केवळ मानसिक त्रास देत नाहीये तर, त्यांच्या जुळ्या मुलींनाही भेटू देत नाही.
नितीश भारद्वाज यांच्या तक्रारीवरून भोपाळ पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त डीसीपी शालिनी दीक्षित यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हे वाचलं का?
पोलीस आयुक्त यासंदर्भात काय म्हणाले?
भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनीही या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात निवेदन देताना ते म्हणाले, 'आम्हाला नितीश भारद्वाज यांची तक्रार आली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.'
2009 मध्ये लग्न आणि नंतर घटस्फोट
ADVERTISEMENT
नितीश भारद्वाज यांनी 14 मार्च 2009 रोजी मध्य प्रदेश कॅडरच्या IAS अधिकारी स्मिता यांच्याशी दुसरे लग्न केले. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून दोघांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना जुळ्या मुली आहेत, ज्या आता 11 वर्षांच्या आहेत.
ADVERTISEMENT
12 वर्षांच्या लग्नानंतर 2022 मध्ये नितीश आणि स्मिता वेगळे झाले. सप्टेंबर 2019 मध्ये या जोडप्याचे नाते तुटले. यानंतर स्मिता आपल्या मुलींसोबत इंदूरमध्ये राहत होत्या. एका मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी त्यांची एक्स पत्नी स्मितापासून वेगळं झाल्याचा खुलासाही केला होता.
मुलाखतीत नितीश भारद्वाज हे ही म्हणाले होते की, 'मी सप्टेंबर 2019 मध्ये फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही वेगळे का झालो याच्या खोलात मला जायचं नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. मी एवढंच म्हणू शकतो की घटस्फोट मृत्यूपेक्षा अधिक वेदनादायक आहे, विशेष म्हणजे तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही एकटं जगत असता. 2022 मध्ये आमचा घटस्फोट झाला.'
नितीश यांना महाभारतातून मिळाली होती प्रसिद्धी!
नितीश भारद्वाज यांनी प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'महाभारत'मध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. त्यांचे श्रीकृष्ण हे पात्र लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरले होते. त्यामुळे त्यांना इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळाली. आजही चाहते श्रीकृष्णाच्या पात्रासाठी त्यांची आठवण ठेवतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT