Salman Khan: 'मला संपवण्याचा प्लॅन, माझं खानदानही धोक्यात...'; सलमानने उडवून दिली खळबळ
Salman Khan Firing Case : मुंबईत 14 एप्रिल रोजी सकाळी सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला. हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सलमान खानच्या जबाबात नेमकं काय?
Salman Khan Firing Case : मुंबईत 14 एप्रिल रोजी सकाळी सलमान खानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला. हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला. गोळीबार करणारे गुन्हेगार दुचाकीवरून आले होते, त्यांनी सलमानच्या घराबाहेर काही राउंड फायर केले आणि तेथून पळ काढला. नंतर मुंबई पोलिसांनी या गुन्हेगारांना पकडले. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सुपरस्टार सलमान खानचे जबाबही नोंदवले होते, जे आता हाती लागले आहेत. (salman khan exclusive mumbai crime branch firing case chargesheet he said in recorded statement lawrence bishnoi wants to kill me)
ADVERTISEMENT
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये सलमान खानने दिलेल्या वक्तव्याचाही समावेश करण्यात आला आहे. घरावर गोळीबार झाला त्यावेळी तो कुठे होता आणि काय करत होता, हे सलमानने आपल्या जबाबात सांगितले होते. 4 जून रोजी सलमानने मुंबई क्राइम ब्रँचच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलकडे त्याचे जबाब नोंदवले होते. त्यात त्याने कोणते खुलासे केले ते जाणून घेऊयात.
हेही वाचा : Manoj Jarange: 'भाजप कधीच सत्तेत येऊ देऊ नका', जरांगेंचा मराठा समाजाला उघडउघड मेसेज!
सलमान खानच्या जबाबात नेमकं काय?
मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचला दिलेल्या जबाबात सलमान खान म्हणाला होता की, 'मी व्यवसायाने फिल्मस्टार आहे आणि गेल्या 35 वर्षांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. अनेक प्रसंगी माझ्या हितचिंतकांची आणि चाहत्यांची गर्दी वांद्रे येथील बँडस्टँडजवळील माझे घर गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ जमते. त्यांच्या प्रेम आणि आदरासाठी मी माझ्या फ्लॅटच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून हात दाखवतो.
हे वाचलं का?
तसेच, माझ्या घरी, मित्रपरिवारात पार्टी असते, माझे वडील येतात, मी त्यांच्यासोबत बाल्कनीत वेळ घालवतो. कामानंतर किंवा सकाळी लवकर मी ताजी हवा घेण्यासाठी बाल्कनीत जातो. मी स्वतःसाठी खासगी सुरक्षा देखील घेतली आहे.
हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha: अजित पवार-अमित शाहांची मध्यरात्री बैठक, हव्यात 'इतक्या' जागा?
2022 मध्ये माझ्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर माझ्या वडिलांना एक पत्र मिळाले होते ज्यात मला आणि माझ्या कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. मार्च 2023 मध्ये, मला माझ्या अधिकृत ई-मेल आयडीवर माझ्या टीमच्या एका कर्मचाऱ्याकडून एक मेल आला, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई प्रमाणेच मला आणि माझ्या कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. माझ्या टीमने याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
ADVERTISEMENT
या वर्षी जानेवारी महिन्यात पनवेलमधील माझ्या फार्महाऊसमध्ये दोन जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला. या दोघांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. माझ्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन्ही गुन्हेगार राजस्थानमधील फाजिल्का गावातील असून ते लॉरेन्स बिश्नोई याचेही गाव आहे, असे मला पोलिसांकडून समजले. मी माझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांना, माझे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले आहे. मला मुंबई पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा दिली आहे. माझ्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित पोलीस, बॉडीगार्ड माझ्यासोबत नेहमी राहतात.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Nepal Plane Crash: काठमांडूत भयंकर अपघात! उड्डाण करताच कोसळले विमान अन्...
14 एप्रिल 2024 रोजी मी झोपलो होतो. अचानक पहाटे 4 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास मी फटाक्यांसारखा आवाज ऐकला. तेव्हा पोलीस अंगरक्षकाने सांगितले की, दुचाकीवरून आलेल्या दोन लोकांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत बंदुकीतून गोळीबार केला. याआधीही मला आणि माझ्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याचे प्रयत्न झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतल्याचे मला समजले आहे. मला विश्वास आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने माझ्या बाल्कनीत गोळीबार केला होता.
यानंतर माझ्या अंगरक्षकाने वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांनी फेसबुक पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. याआधी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगने एका मुलाखतीत मला आणि माझ्या कुटुंबाला संपवण्याविषयी वक्तव्य केले होते. त्यामुळे माझे कुटुंबीय झोपेत असताना लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या गँगसोबत हा गोळीबार केला असे मला वाटते. मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याचा त्याचा प्लॅन होता, त्यासाठी त्याने हा हल्ला केला.' असा जबाब नोंदवत सलमान खानने यावर स्वाक्षरी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT