Ambani: अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात; अंबानी-मर्चंट कुटुंबीयांची धमाल-मस्ती!
Radhika and Anant Ambani wedding : उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.
ADVERTISEMENT

Radhika and Anant Ambani wedding ceremony begins : उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज (4 जुलै) अंबानी कुटुंबात गुजराती परंपरेनुसार 'मामेरू' हा महत्त्वाचा विवाहपूर्व विधी पार पडला. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी हा विधी पार पडला आहे. या समारंभात काय घडले, कोणत्या पाहुण्यांनी हजेरी लावली? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. (Anant Radhika pre-wedding ritual begins Ambani-merchant family celebrated together)
आज झालेल्या मामेरू सोहळ्या दरम्यान अंबानी कुटुंबिय सर्व पाहुण्यांचं स्वागत करताना दिसले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न 12 जुलै रोजी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. यापूर्वीही अंबानी कुटुंबाने दोन प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित केले होते. आज अंबानी कुटुंबीयांच्या घरी मामेरू विधी पार पडला. या विधीमध्ये नीता अंबानी यांचे माहेरचे कुटुंबियही इथे उपस्थित होते.
हेही वाचा : उत्पन्नाचा दाखला नसेल तरी टेन्शन घेऊ नका, असे मिळतील 1500 रुपये!
मामेरू कार्यक्रमात ईशा अंबानी नारंगी रंगाच्या लेहेंग्यात दिसल्या. त्याच वेळी, राधिका मर्चंट आणि श्लोका अंबानी देखील केशरी रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होत्या. राधिका मर्चंटने तिचा लुक पूर्ण करण्यासाठी मांगटिका देखील परिधान केला होता.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. आज मामेरू विधीच्या वेळी नवरदेव (अनंत अंबानी) केशरी रंगाच्या कुर्त्यामध्ये छान दिसत होते. आई नीता अंबानीसोबत कॅमेऱ्यासमोर ते पोज देतानाही दिसले.
हेही वाचा : Crime: नगरसेवकाला बाथरुममध्ये बोलावलं अन् गुप्तांगच कापून टाकलं
मामेरू कार्यक्रमावेळी मुकेश अंबानी आपल्या नातवंडांसोबत टाइम स्पेंड करतानाही दिसले. नातवंडांना कडेवर घेऊन मुकेश अंबानी स्पॉट झाले होते. या इव्हेंटचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल होत असून राधिका मर्चंटच्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या कार्यक्रमासाठी फार जास्त कोणी बॉलिवूड सेलिब्रिटी दिसले नाहीत.