'नाना पाटेकर खोटारडे आहेत, ते...'; तनुश्री दत्ता नानांवर का भडकली?

रोहिणी ठोंबरे

Nana Patekar-Tanushree Dutta Controversy : बॉलिवूडमध्ये चर्चेत असणाऱ्या नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्या वादाची आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नानांनी बऱ्याच वर्षानंतर या वादावर मौन सोडले आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तनुश्री दत्ताचा चढला पारा, नेमकं घडलं काय?

point

'नाना घाबरलेत', तनुश्री असे का म्हणाली?

Tanushree Dutta on Nana Patekar : बॉलिवूडमध्ये चर्चेत असणाऱ्या नाना पाटेकर आणि अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्या वादाची आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नानांनी बऱ्याच वर्षानंतर या वादावर मौन सोडले आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले की, 'तनुश्रीने माझ्यावर जे लैंगिक अत्याचाराचे आरोप केले त्याने मला काहीच फरक पडत नाही.' आता नानांचे हेच वक्तव्य तनुश्रीच्या मनाला लागले आहे. तिने यावर संताप व्यक्त केला. (tanushree dutta on nana patekar she said nana is liar he is now afraid

तनुश्री दत्ताचा चढला पारा, नेमकं घडलं काय?

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. ज्यामध्ये ती म्हणाली, 'जेव्हापासून वाराणसीत एका मुलाला कानशिलात लगावल्याचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे... तेव्हापासून नाना किती खोटारडे आहेत हे साऱ्या जगाला कळले आहे. त्यावेळी ते अनिल शर्मा यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत होते. नानांनी आधी मुलाला कानशिलात लगावली आणि नंतर तो शूटचा एक भाग असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. जनतेने जेव्हा त्यांना शिवीगाळ केली त्यावेळी त्यांनी ही चूक लपवायला सुरुवात केली. पण नंतर त्यांनी यू-टर्न घेतला आणि माफी मागायला सुरुवात केली.'

हेही वाचा : नवाब मलिक जिंकणार की हरणार?, 'त्या' निर्णयावर सारं अवलंबून!

तनुश्री तिला झालेल्या त्रासावर म्हणाली की, 'आता नाना या विषयावर बोलत आहेत कारण त्यांना इंडस्ट्रीतून बाजूला केले गेले आहे. ते घाबरले आहेत. इंडस्ट्रीत असलेला त्यांचा आधार कमजोर झाला आहे. ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला ते सर्व एकतर दिवाळखोर झाले आहेत किंवा नानांना त्यांनी बाजूला केले आहे. नाना लोकांचे विचार कसे बदलतात हे आता लोकांना पाहायला मिळत आहे. आग कशी लावायची आणि खोटे कसे बोलायचे यामध्ये नाना माहीर आहेत.'

'नाना घाबरलेत', तनुश्री असे का म्हणाली?

तनुश्री दत्ता पुढे डिंपल कपाडिया आणि वाराणसीत घडलेल्या कृत्याचा उल्लेख करत म्हणाली, 'सगळेच खोटं नाही बोलू शकत ना... चला, समजा मी खोटं बोलतेय पण डिंपलसुद्धा बोलली होती की ते चांगले व्यक्ती नाही आहेत. वाराणसीत घडलेल्या घटनेत मुलानेही सांगितलं होतं की, त्याला खरंच कानशिलात लगावली होती.  जर ते कानशिलात मारू शकतात, डायरेक्टरसोबत मारहाण करू शकतात मग त्यांच्यासाठी एखाद्या महिलेसोबत गैरवर्तन करणे मोठी गोष्ट नाही.'

हे वाचलं का?

    follow whatsapp