Rituraj Singh Died: छोट्या पडद्यावरील मोठ्या कलाकाराची एक्झिट! 59 व्या वर्षी निधन

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

TV Actor Rituraj Singh Passes Away : ग्लॅमर इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंग (Rituraj Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 59 वर्षे होते. 19 फेब्रुवारीच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने (cardiac arrest) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'अपनी बात', 'ज्योती', 'हिटलर दीदी', 'शपथ', 'वॉरियर हाय', 'आहट', 'अदालत', 'दिया और बाती' यांसारख्या अनेक शोमध्ये ऋतुराज सिंग दिसले होते. ते सध्या 'अनुपमा' या स्टारप्लस वाहिनीवरील मालिकेत काम करत होते. (TV AcRituraj Singh Passes Away at the age of 59 years old due to cardiac arrest)

मिळालेल्या माहितीनुसार ऋतुराज सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ते फक्त 59 वर्षांचे होते. आणि ते काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. ते छोट्या पडद्यावरील मोठा चेहरा होते. लोक त्यांना पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा व्यक्त केली जात आहे. 

ऋतुराज यांना रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल

माहितीनुसार, ऋतुराज सिंह स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल रात्री म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर लोकांनी आणि जवळच्या लोकांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. अभिनेत्याचे चांगले मित्र अमित बहल यांनी याविषयी माहिती देत शोक व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रुग्णालयातून परतत असताना झाला मृत्यू

अमित बहल म्हणाले, 'हृदयविकाराच्या झटक्याने ऋतुराज यांचा मृत्यू झाला. स्वादुपिंडाच्या आजाराच्या उपचारासाठी त्यांना काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरी परतत असताना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांचे निधन झाले.' याआधी 'अनुपमा'मध्ये मित्राच्या भूमिकेत दिलेल्या नितेश पांडेचेही निधन झाले. त्याचे वय 51 वर्षे होते. त्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT