दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कोर्टात का माफी मागितली? काय आहे प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kashmir files Director vivek agnihotri : न्यायमूर्तींविरोधात केलेल्या टिप्पणीप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. यानंतर उच्च न्यायालयाने त्याची आरोपातून मुक्तता केली. हे प्रकरण 2018 मध्ये न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या विरोधात केलेल्या ट्विटशी संबंधित आहे.त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने अग्निहोत्री याच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अग्निहोत्री याने सोमवारी न्यायालयात हजर राहून बिनशर्त माफी मागितली. (Why did director Vivek Agnihotri apologize in court? What is the matter?)

Kashmir Files वर प्रकाश राज यांची कमेंट, ‘लोक लायकीप्रमाणे..’ अनुपम खेर यांचा संताप!

न्यायालयाने काय म्हटले?

उच्च न्यायालयाने सांगितले की, विवेक अग्निहोत्री आज वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर झाले. आक्षेपार्ह ट्विटबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला असून बिनशर्त माफी मागितली आहे. न्यायालयाचा मान दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोर्टाने म्हटले की, अग्निहोत्रीने सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे आपल्या वागणुकीबद्दल खेद असल्याचे दर्शवते. आपण न्यायव्यवस्थेचा आदर करतो आणि जाणूनबुजून न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असे अग्निहोत्री म्हणाले.

कपिल शर्मा पुन्हा वादात; विवेक अग्निहोत्रीच्या आरोपानंतर चाहते भडकले

ADVERTISEMENT

न्यायालयाने अग्निहोत्री यांच्याविरुद्ध बजावलेली कारणे दाखवा नोटीसही मागे घेतली असून त्याची फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अग्निहोत्री याची माफी स्वीकारत न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती विकास महाजन यांनी त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आणि भविष्यात असे कोणतेही वर्तन टाळण्याचा सल्ला दिला.

ADVERTISEMENT

काय प्रकरण आहे?

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या नजरकैदेचा आदेश रद्द करण्याच्या न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या निर्णयावर विवेक अग्निहोत्री याने टीका केली होती. या संदर्भात, त्याने 2018 मध्ये एक ट्विट केले होते, ज्यावर न्यायालयाने स्वतःहून दखल घेत विवेक अग्निहोत्री विरोधात अवमानाची कारवाई सुरू केली होती. शिवाय शास्त्रज्ञ आनंद रंगनाथन यांच्यावरही अवमानाचा खटला सुरू होता. या प्रकरणातील आदेशानंतर चित्रपट दिग्दर्शकाने न्यायाधीश एस मुरलीधर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 मे रोजी होणार आहे.

द कश्मीर फाईल्स;वर टीका : IFFI ज्युरी प्रमुखांच्या विधानाला स्वरा भास्करचं समर्थन; तर विवेक अग्निहोत्री म्हणाला;

    follow whatsapp

    ADVERTISEMENT