Advertisement

सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या 8 कोटींच्या 'या' भेटवस्तूच जॅकलिन फर्नांडिससाठी ठरल्या 'सापळा'

jacqueline fernandez conection with sukesh chandrasekhar : ईडीने सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं, यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही आरोपी बनवण्यात आलं आहे.
jacqueline fernandez conection with sukesh chandrasekhar
jacqueline fernandez conection with sukesh chandrasekhar

भेटवस्तू कुणाला आवडत नाहीत? समोरची व्यक्ती भेटवस्तू देत असताना घ्यायला कोण नकार देईल? पण कधी कधी अशा भेटवस्तूही गोत्यात आणू शकतात. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत असंच घडलंय. मूळची श्रीलंकेची असलेली जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून घेतलेल्या गिफ्टमुळे अडचणीत आलीये.

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. या पुरवणी आरोपपत्रात ईडीने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही आरोपी बनवण्यात आलं आहे.

दिल्ली न्यायालय ३१ ऑगस्ट रोजी या आरोपपत्रावर सुनावणी घेणार आहे. ईडीने अनेक वेळा जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावलेलं होतं. त्याचबरोबर अनेकदा तिची चौकशीही झाली होती.

jacqueline fernandez conection with sukesh chandrasekhar
जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरमुळे ईडीच्या जाळ्यात कशी अडकली?

ईडीने ७.२७ कोटींच्या फंडावर टाच

सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटींच्या प्रकरणात ईडीने पहिल्यांदाच जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचा उल्लेख केला आहे. जॅकलिन फर्नांडिसला आरोपी बनवण्यात आलं आहे. यापूर्वीच्या आरोपपत्रात जॅकलिनचं नाव आरोपी म्हणून नव्हतं. ईडीने पीएमएलए कायद्यानुसार एप्रिलमध्ये १५ लाख रोख रकमेसह ७.२७ कोटी रुपयांचा फंड जप्त केला होता.

ईडीने आपल्या जबाबात म्हटलं आहे की, सुकेश चंद्रशेखरने जबरदस्तीने खंडणी वसुलीसह इतर गुन्हेगारी मार्गाने मिळवलेल्या पैशांतून जॅकलिन फर्नांडिसला ५.७१ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या. सुकेशने त्याची पूर्वीची सहकारी आणि या प्रकरणातील आरोपी पिंकी ईराणी हिला या भेटवस्तू जॅकलिनला देण्यास सांगितलं होतं.

ईडीच्या माहितीप्रमाणे भेटवस्तूंबरोबरच चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसच्या कुटुंबाला १,७२,९१३ अमेरिकन डॉलर म्हणजे १.३ कोटी रुपये दिले होते. चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसच्या वतीने एका लेखकाला वेब सीरिजची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी १५ लाख रुपये दिले होते.

jacqueline fernandez conection with sukesh chandrasekhar
215 कोटी वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या; पोस्ट शेअर करत म्हणाली..

जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरने कोणत्या भेटवस्तू दिल्या होत्या?

ईडीने दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिन फर्नांडिसने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार तिला सुकेशने गुस्सी, चॅनेल या प्रसिद्ध ब्रॅण्डसच्या डिझायनर बॅग्स दिल्या होत्या. २ गुस्सी जिमवेअर आऊटफिट्स, लुऊस वृईट्टनचे शूज, हिऱ्याच्या ईअररिंग्जच्या दोन जोड्या, मल्टी कलर् स्टोन्सचं एक आणि २ हरमेजचे ब्रेसलेट दिले होते.

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला मिनी कुपर कारही भेट दिली होती. जॅकलिन फर्नांडिसने या भेटवस्तू घेण्यास नकार दिला आणि त्या परत केल्या. ईडीने सांगितलं की, जॅकलिन फर्नांडिस मागील फेब्रुवारी ते ऑगस्ट पर्यंत सातत्यानं सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in