अमिताभ बच्चन यांच्याकडून शीव रुग्णालयास ‘व्हेंटिलेटर’ची देणगी

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शीव परिसरात असणा-या मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास – १’ प्रकारातील २ अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत. त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किमतीची यंत्र सामुग्री देखील श्री. बच्चन यांनी देणगी स्वरुपात रुग्णालयास दिली आहे. या अनुषंगाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या व वैद्यकीय कर्मचा-यांच्या वतीने बच्चन यांचे आभार मानले आहेत. सदर दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे शीव रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात काही दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’द्वारे गेल्या काही दिवसात सुमारे ३० गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती शीव रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.बच्चन यांच्याद्वारे देणगी स्वरुपात प्राप्त झालेले दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक व अद्ययावत ‘व्हेंटिलेटर’ आहेत. या यंत्रांद्वारे ज्या रुग्णांची प्राणवायू (ऑक्सिजन) पातळी खालावलेली आहे, अथवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी या ‘व्हेंटिलेटर’चा उपयोग केला जात आहे. या अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’चे वैशिष्ट्ये म्हणजे याद्वारे गरजू रुग्णांना १०० टक्क्यांपर्यंत प्राणवायू (ऑक्सिजन) देण्याची सुविधा यामध्ये आहे. त्याचबरोबर प्राणवायू दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची सुविधा सदर ‘व्हेंटिलेटर’ मध्ये असून नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा देखील यात आहे. तसेच ‘नॉन इन्व्हेझिव्ह मास्क’ पद्धतीने ऑक्सिजन देण्याची सुविधा या ‘व्हेंटिलेटर’मध्ये आहे, अशीही माहिती डॉ. जोशी यांनी या निमित्ताने दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT