आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घालणाऱ्या खट्याळ ‘मॉनिटर’ ची मालिका विश्वात बालकलाकार म्हणून एंट्री

आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातल्या नंतर बालकलाकार हर्षद नायबळची आता मालिका विश्वात एण्ट्री होणार आहे.
आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घालणाऱ्या खट्याळ ‘मॉनिटर’ ची मालिका विश्वात बालकलाकार म्हणून एंट्री

आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातल्या नंतर बालकलाकार हर्षद नायबळची आता मालिका विश्वात एण्ट्री होणार आहे. स्टार प्रवाहवर १७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता सुरु होणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेत तो पिंकी या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे. दिप्या असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पिंकी आणि पिंकीची लहान बहिण निरीला नेहमी साथ देणारा असा हा लाडका भाऊ आहे. वयाने लहान असला तरी तितकाच समंजस आणि वडिलांच्या मेहनतीची जाण असलेला हा दिप्या.

हर्षदला गाण्याची आवड तर आहेच. मात्र या मालिकेच्या निमित्ताने त्याची अभिनयाची आवडही जोपासली जाणार आहे. पिंकीचा विजय असो ही त्याची पहिलीच मालिका असून तो या भूमिकेसाठी खुपच उत्सुक आहे. सेटवर हर्षद सर्वांचा लाडका असून तो आपल्या गाण्याने सर्वांचच मनोरंजन करत असतो. तेव्हा नव्या वर्षात हर्षदचा हा नवा अंदाज पाहायला सज्ज व्हा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in