फार्म हाऊस, हार्ट अटॅक की हत्येचा कट?, सतीश कौशिकांच्या शेवटच्या 12 तासातील कहाणी
Satish Kaushik: मुंबई: अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) हे 8 मार्च रोजी सकाळी दिल्लीला (Delhi) पोहोचले. यानंतर त्यांनी विमानतळावरून थेट बिजवासन येथील फार्म हाऊस गाठले. हे फार्म हाऊस त्यांचा जुना मित्र आणि कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू (Vikas Malu) यांचे आहे. या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर […]
ADVERTISEMENT

Satish Kaushik: मुंबई: अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) हे 8 मार्च रोजी सकाळी दिल्लीला (Delhi) पोहोचले. यानंतर त्यांनी विमानतळावरून थेट बिजवासन येथील फार्म हाऊस गाठले. हे फार्म हाऊस त्यांचा जुना मित्र आणि कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू (Vikas Malu) यांचे आहे. या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोन दिवसांनी विजय मालूच्या पत्नीने एक खळबळजनक दावा केला आहे. चला तर मग जाणून घेऊया सतीश कौशिकसोबत शेवटच्या 12 तासात काय घडलं? (farm house heart attack or murder conspiracy know the story of last 12 hours of satish kaushik)
7 मार्च 2023, जुहू – मुंबई
होळीच्या एक दिवस आधी जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या घरी होळी पार्टी केली. सर्व पाहुण्यांसोबत सतीश कौशिक यांनीही होळी पार्टीला हजेरी लावली. जावेद अख्तर आणि सतीश कौशिक हे खूप जुने मित्र आहेत. सतीश कौशिक संपूर्ण पार्टी दरम्यान पूर्णपणे ठीक होते. या पार्टीचे अनेक फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पार्टी आटोपल्यानंतर सतीश कौशिक संध्याकाळी वर्सोवा येथील त्यांच्या घरी पोहोचले. या घरात सतीश कौशिक पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिकासह राहत होते. रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र होते. तेव्हाही सतीश कौशिक पूर्णपणे बरे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची दिल्लीला जाण्यासाठी फ्लाइट होती.
8 मार्च 2023, मालू फार्म हाऊस, बिजवासन, दिल्ली
सतीश कौशिक यांचे सुमारे 30 वर्ष जुने मित्र आणि व्यापारी विकास मालू यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर होळी पार्टीचे आयोजन केले होते. या होळीच्या पार्टीत सतीश कौशिक यांच्या येण्याचा बेत अनेक दिवसांपूर्वीच झाला होता. विकास मालू हे कुबेर ग्रुपचे मालक आहेत. हाच कुबेर ग्रुप जो सर्व प्रकारचे पान मसाले बनवतो आणि ज्याचा व्यवसाय सुमारे 50 देशांमध्ये पसरलेला आहे. सतीश कौशिक सकाळी 11.30 च्या सुमारास मालू फार्म हाऊसवर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे व्यवस्थापक संतोष रायही होते. होळी पार्टीत एकूण 40 ते 45 पाहुणे होते. दिवसा होळी पार्टी होती. सतीश कौशिक या पार्टीत खूप आनंदी तर दिसत होते. दिल्लीत झालेल्या या होळी पार्टीचा व्हिडीओही समोर आला आहे. कदाचित तो सतीश कौशिक यांच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडिओ असावा. ज्यामध्ये ते पांढरा कुर्ता पायजमा घालून त्यांचा मित्र विकास मालूसोबत डान्स करताना दिसत आहेत.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं आणि या गुटखा किंगचं काय आहे कनेक्शन?