जॅकलिन फर्नांडिसने केली कॉस्मेटिक सर्जरी?; बदललेला लुक पाहून लोक का भडकले?

सौंदर्य स्पर्धेच्या काही वर्षांनंतर जॅकलिनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यावर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.
जॅकलिन फर्नांडिसने केली कॉस्मेटिक सर्जरी?; बदललेला लुक पाहून लोक का भडकले?

जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडच्या ब्युटी क्वीनपैकी एक आहे. जॅकलिनच्या सौंदर्याने चाहते वेडे झाले आहेत. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. बॉलीवूड चित्रपटांची ग्लॅमरस दिवा जॅकलीनने 2006 साली श्रीलंका मिस युनिव्हर्सचा ताजही जिंकला आहे. या सौंदर्य स्पर्धेच्या काही वर्षांनंतर जॅकलिनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यावर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

आता का होतोय जॅकलिनचा व्हिडीओ?

मिस युनिव्हर्स श्रीलंका स्पर्धेच्या प्रश्न-उत्तर फेरीत जॅकलिनला कॉस्मेटिक सर्जरीबद्दल विचारण्यात आले होते, यावर जॅकलिनचे उत्तर आता व्हायरल होत आहे. लोकांना जॅकलिनचे उत्तर खोटे वाटत आहे आणि यावर लोक तिला ट्रोल करत आहेत. कॉस्मेटिक सर्जरीच्या प्रश्नावर जॅकलीन म्हणाली होती- कॉस्मेटिक सर्जरी ही अनफेअर फायदा आहे असे मला वाटते, कारण मला वाटते की ते सौंदर्य स्पर्धेच्या विरोधात आहे. आपण स्त्रियांच्या नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव साजरा केला पाहिजे. ते कोणाला परवडते आणि कोणाला परवडत नाही हे देखील खूप महत्वाचे आहे. सौंदर्यस्पर्धेचा हा अर्थ नाही, असं ती म्हणाली होतीय.

जॅकलिन फर्नांडिसचा कॉस्मेटिक सर्जरीचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी जॅकलिनची बाजू घेतली, तर अनेक लोक तिच्या विरोधात आणि अभिनेत्रीची जबरदस्त खिल्ली उडवताना दिसत आहेत. जॅकलीनला ट्रोल करताना एका यूजरने लिहिले- हाहाहा… बघा कोण बोलत आहे. दुसर्‍या युजरने टोमणे मारत लिहिले, आता किती वेगळे दिसते आहे. दुसर्‍या यूजरने लिहिले - हिला ओळखायला मला वेळ लागला.

जॅकलीनबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. जॅकलिनवर सुकेशकडून करोडोंच्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॅकलीन शेवटची राम सेतूमध्ये दिसली होती. जॅकलीन आता रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in