Jacqueline Fernandezs : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची संपत्ती 'ईडी'ने का केलीये जप्त?

Jacqueline Fernandezs assets attaches : ईडीने ७.२७ कोटींची संपत्ती केली जप्त
Jacqueline Fernandezs : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची संपत्ती 'ईडी'ने का केलीये जप्त?

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीने जॅकलीनची तब्बल ७.२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यात जॅकलीनच्या ७.१२ कोटी रुपयांच्या ठेवींचाही समावेश आहे.

सक्तवसुली संचालनालयाने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची मनी लॉड्रिंग प्रकरणात संपत्ती जप्त केली आहे. एकूण ७.२७ कोटींच्या संपत्ती टाच आणण्यात आली असून, जॅकलीनच्या मोठ्या रकमेच्या ठेवींचाही यात समावेश आहे.

ईडीने दिलेल्या माहितीप्रमाणे सुकेश चंद्रशेखरने खंडणीच्या पैशातून जॅकलीनला ५.७१ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेशने जॅकलीनच्या कुटुंबियांनाही महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. जॅकलीनच्या कुटुंबियांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या सामानाबरोबर १.३२ कोटी आणि १५ लाख रुपयेही दिले होते.

Jacqueline Fernandezs : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची संपत्ती 'ईडी'ने का केलीये जप्त?
सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आयुष्यात कधी व कसा आला?

जॅकलीन मागील काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर होती. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नाडीस यांचं रिलेशनशिप समोर आल्यापासून जॅकलीन वादात अडकली आहे.

सुकेशने दिल्लीतील तुरुंगात असतानाच एका महिलेकडून २१५ कोटी रुपये उकळले होते. याच खंडणीच्या पैशातून सुकेशने जॅकलीनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या.

यात हिरे, दागिने, ५२ लाखांचा घोडा, मांजरी अशा गोष्टींचा समावेश होता. खंडणी वसुलीच्या प्रकरणात ईडीने सुकेशवर कारवाई केली होती. मागील वर्षभरापासून या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे.

Jacqueline Fernandezs : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची संपत्ती 'ईडी'ने का केलीये जप्त?
सुकेश चंद्रशेखरसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोबाबत जॅकलिनने सोडलं मौन, म्हणाली....

सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात ईडीकडून अनेकदा जॅकलीनची चौकशी करण्यात आली आहे. ईडीकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार जॅकलीनविरुद्धची ही कारवाई प्राथमिक स्वरुपाची आहे. जॅकलीनला या प्रकरणात आतापर्यंत आरोपी बनवलं गेलेलं नाही.

मात्र, या प्रकरणात जॅकलीन आणखी अडकू शकते, अशी माहिती आहे. ईडीने जॅकलीनला या प्रकरणात आरोपी बनवलेलं नसलं, तरी क्लीनचीटही दिलेली नाही. तसेच जॅकलीनला देश सोडून जाण्याचीही परवानगी नाही.

जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याचबरोबर दोघांचे काही खासगी छायाचित्रंही समोर आली होती. जॅकलीनने सुकेशसोबत रिलेशनशिपबद्दलच्या चर्चांना दुजोरा दिलेला नसला, तरी फोटोमुळे जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

Jacqueline Fernandezs : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची संपत्ती 'ईडी'ने का केलीये जप्त?
पर्शियन मांजरी, 52 लाखांचा घोडा आणि बरंच काही...; 'जॅकलिन'वर महागड्या भेटवस्तूंची उधळण

सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणामुळे वादात अडकलेल्या जॅकलीनविरुद्ध ईडीकडून आणखी काय कारवाई होणार, हे पुढील काही काळात दिसेल. दरम्यान, जॅकलीनचे काही सिनेमे आगामी काळात येणार आहेत. यात रामसेतू, सर्कस, विक्रांत रोना या चित्रपटांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.