लालसिंग चढ्ढानंतर लायगरने केली निराशा, दुसऱ्या दिवसाच्या कमाईत मोठी घट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्टारर लायगर’ या चित्रपटाची बरीच चर्चा होती. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 33.12 कोटी रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. लायगरने दुसऱ्या दिवशीही कमी कमाई केली आहे. ज्याप्रमाणे विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेयांच्या चित्रपटाचे प्रमोशन सुरू होते ते पाहून चित्रपट बक्कळ कमाई करेल असे वाटत होते. पण पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शननंतर सगळ्या आशा मावळताना दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी लायगरच्या कमाईत मोठी घसरण झाली.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाने शुक्रवारी केवळ 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसरीकडे, लायगरचा व्यवसायाची तुलना लाल सिंह चड्ढासोबत केली तर आमिर खानच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 7.26 कोटींचा व्यवसाय केला. सर्वांना आशा होती की लायगर वीकेंडला चांगली कमाई करेल परंतु पूर्ती निराशा झालेली पाहायला मिळाली. अजून उद्याचा दिवस आहे त्यादिवशी लायगर आपली कमाई करतो की लालसिंह चढ्ढा चित्रपटासारखाच आपटतो हे पाहावं लागणार आहे. चित्रपटाबद्दल नकारात्मक टिपण्णी समोर येत आहेत, त्यामुळे त्याचा फटका चित्रपटाला बसला असल्याचं बोललं जात आहे.

विजय देवरकोंडाने लायगर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर माईक टायसननेही लायगरमध्येकॅमिओ केला होता. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे. कदाचित त्यामुळेच लोक दाक्षिणात्य अभिनेत्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान यापूर्वी बॉलिवूडचे चित्रपट बॉयकॉट करा असा ट्रेंड होता. लालसिंग चढ्ढा सारख्या चित्रपटाला लोकांनी बॉयकॉट करून टाकले. त्याचबरोबर बॉयकॉट ट्रेंड ज्या अभिनेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडल्या त्यांना देखील लोकांनी ट्रोल केले. त्यामुळे इथून मागेकरोडोंची कमाई करणारे बॉलीवूड चित्रपट कुठंतरी धोक्यात आले आहेत. साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतआहेत ही मात्र आश्चर्याची गोष्ट आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT