Big Boss Marathi 5: '... जसं दिसतं तसं नसतं'; आर्याच्या 'त्या' स्टोरीतून नेमके कोणते संकेत?
Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) टास्क दरम्यान तुफान राडे होताना दिसतात. अशावेळी नुकत्याच सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या जाधव (Aarya Jadhao) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) मध्ये प्रचंड वादावादी झाली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉसच्या आदेशानुसार आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं.
आता आर्याची इन्स्टाग्राम स्टोरी प्रचंड व्हायरल होत आहे.
यामध्ये तिने एक खास कॅप्शन लिहिलं आहे.
Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) टास्क दरम्यान तुफान राडे होताना दिसतात. या सीझनमध्ये जोरदार वादावादी होत आहेत. अशावेळी नुकत्याच सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या जाधव (Aarya Jadhao) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) मध्ये प्रचंड वादावादी झाली. आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे भाऊच्या धक्यावर आर्याला रितेश देशमुखने खूप सुनावलं. यानंतर बिग बॉसच्या आदेशानुसार आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. आता आर्याची इन्स्टाग्राम स्टोरी प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने एक खास कॅप्शन लिहिलं आहे. (bigg boss marathi season 5 aarya jadhao slaps nikki tamboli Now she is out of the bb house her insta story goes viral)
ADVERTISEMENT
आर्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये, ती गाडीतून प्रवास करताना दिसत आहे. त्यावरील कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'जग जगू देत नसेल तरी जगात जागा होणं जरूरी असतं, कधी कधी जसं दिसतं तसं नसतं', यावरून आर्याचे चाहते कोड्यात पडले आहेत. जसं दिसतं तसं नसतं यावरून आर्या पुन्हा एन्ट्री करू शकते अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : पोलीस महिलेला फुटला मातृत्वाचा पाझर! बाळाला पाजलं अंगावरचं दूध, पण तपासातून समोर आली भयंकर माहिती
त्याचवेळी आता दुसरीकडे आर्याचे चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आर्या जाधवला फुल्ल सपोर्ट केला आहे. निक्कीला अद्दल घडवायला हवी होती असे म्हणत नेटकऱ्यांनी आर्याचे कौतुक केले आहे. आर्याला घराबाहेर काढल्यामुळे बिग बॉस मराठी पाहणं बंद करणार असल्याचा इशाराही नेटकऱ्यांनी दिला आहे. चाहत्यांच्या या पाठिंब्यामुळे बिग बॉस मराठीमध्ये नवा ट्विस्टही येऊ शकतो. आर्याची पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
आर्याला सपोर्ट करत चाहते मैदानात
आतापर्यंत निक्कीने अनेकदा टास्क दरम्यान इतर स्पर्धकांसोबत केस खेच, कपडे ओढ असे प्रकार केले आहेत, तेव्हा मात्र बिग बॉस काहीच म्हणाले नाही, अशी प्रतिक्रिया आर्याच्या चाहत्यांकडून येत आहे. आता आम्ही बिग बॉस बघणार नाही... आर्या ने जे केलं ते 100% बरोबर होतं... निक्की ने काय पण केले तर चालतंय पणं तेच दुसऱ्यांनी केल्यावर चालत नाही, आतापर्यंत निक्की ने काय काय नियम मोडलेत तरी तिला काय शिक्षा नाही... अशा वेगवेगळ्या कमेंट्स करत चाहते आर्याच्या सपोर्टसाठी मैदानात उतरले आहेत. अशावेळी आता कोणता नवा ट्विस्ट येतोय हे पाहणं रंजक ठरणार आहे.
हेही वाचा : Gold Price: सोन्याचा विषयच हार्ड! किंमत बघूनच म्हणाल बाईईई हा काय प्रकार? जाणून घ्या आजचा भाव...
निक्की-आर्यामध्ये नेमकं काय घडलं होतं?
नव्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा उसगांवकर, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या आणि निक्की यांच्यात जोरात जुंपली. निक्की आणि आर्याच्या या भांडणाचे रूपांतर नंतर धक्काबुक्कीत झाले आणि आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. यानंतर निक्कीने 'बिग बॉस'ला सांगितले की, "आर्याने मला मारलंय...मी हे सहन करू शकत नाही". बिग बॅास यांनी आर्याच्या या कृत्याचा निषेध केला आणि भाऊच्या धक्क्यावर शनिवारच्या एपिसोडमध्ये आर्याला घराबाहेर काढलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT