Bigg Boss Marathi: बिग बॉस देणार गुलीगत धोका, 'हा' सदस्य आज घराबाहेर पडणार?
Mid Week Eviction, Bigg Boss Marathi : कलर्स मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत संपूर्ण सीझनमध्ये सगळ्यात कठीण आणि त्रासदायक असते ते म्हणजे मीड विक इविक्शन, असे बिग बॉस म्हणताना दिसले आहे. त्यामुळे आज मीड विक इविक्शन पार पडणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉसच्या सदस्यांना धक्का बसणार
मिडविक इविक्शन आज पार पडणार
कोणता सदस्य घराबाहेर पडणार?
Mid Week Eviction, Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीचा ग्रॅड फिनाले हा 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातला हा शेवटचा आठवडा असणार आहे. या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या इतिहासात जी गोष्ट घडलेली नाही ती गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे बिग बॉस मराठीत मीड विक इविक्शन (Mid week Eviction) होणार आहे.सध्या निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) तिकीट टू फिनालेमध्ये बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर उर्वरीत सहा सदस्य हे नॉमिनेट झाले आहेत. या सहा सदस्यापैंकी एक सदस्य आता घराबाहेर जाणार आहे. (bigg boss marathi season 5 today mid week eviction ankita walawalkar or varsha usgaonkar elimineted social media post viral)
कलर्स मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत संपूर्ण सीझनमध्ये सगळ्यात कठीण आणि त्रासदायक असते ते म्हणजे मीड विक इविक्शन, असे बिग बॉस म्हणताना दिसले आहे. त्यामुळे आज मीड विक इविक्शन पार पडणार आहे. अशात सध्या घरात अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर असे सात सदस्य घरात आहेत. या सदस्यांपैकी निक्की तांबोळीने 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे ती यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली आहे. तर उर्वरीत सहा सदस्य हे घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट ठरले आहेत. या सदस्यांपैकी एक सदस्य आज मीड वीक इविक्शनमध्ये घराबाहेर पडणार आहे.
हे ही वाचा : Rajinikanth Admitted to Hospital: सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल, एका रात्रीत असं काय घडलं?
दरम्यान हा सदस्य कोण असणार आहे? याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर आणि वंडर गर्ल वर्षा उसगांवकर या दोन सदस्यांपैकी एक सदस्य आज मीड विक इविक्शनमध्ये घराबाहेर पडणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. नेटकरी वर्षा आणि अंकिता पैकी एक सदस्य घराबाहेर पडेल, अशी चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या अनेक फॅन पेजवर अंकिता वालावलकरचा घरातील प्रवास संपणार असल्याचे बोलले जात आहे. तर काही नेटकरी हे वर्षा उसगांवकर यांचा घरातील प्रवास आज संपणार असल्याचे बोलत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
त्यामुळे अनेकांनी मिडवीक इविक्शनबद्दल अंदाज बांधायला सूरूवात केली आहे. या इविक्शननंतर बिग बॉसला टॉप 5 कटेंस्टंट मिळणार आहे. हे 5 कटेंस्टंट नेमके कोणते असणार आहेत? आणि कोणता सदस्य घराबाहेर पडणार आहे? हे पाहणे आज महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : Dharmveer 2 Collection : 'नवरा माझा नवसाचा 2' सिनेमाला टाकलं मागे, विकेंडमध्ये 'धर्मवीर'ने कमावले 'इतके' कोटी?
ADVERTISEMENT