Dharmveer 2 Collection : 'नवरा माझा नवसाचा 2' सिनेमाला टाकलं मागे, विकेंडमध्ये 'धर्मवीर'ने कमावले 'इतके' कोटी?
Dharmveer 2 Box Office Collection Day 3 : प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक आणि क्षितीश दाते यांची प्रमुख भूमिका असलेला आणि प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 सिनेमा हा 27 सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने विकेंडमध्ये 7.92 कोटीची कमाई केली आहे. ही कमाई करत धर्मवीर सिनेमाने अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाला मागे टाकले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
धर्मवीरने विकेंडमध्ये केली बक्कळ कमाई
नवरा माझ्या नवसाचा 2 सिनेमाला कमाईत टाकले मागे
धर्मवीर 2 ने किती कोटीची कमाई केली?
Dharmveer 2 Box Office Collection Day 3 : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe)यांचे जीवनपट उलगडणारा धर्मवीर 2 सिनेमा हा 27 सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे पहिल्याच विकेंडमध्ये या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात रिलीज झालेल्या नवरा माझा नवसाचा 2 (Navara Majha Navsacha 2) या सिनेमाला देखील धर्मवीर 2 ने (Dharmveer 2 ) मागे टाकले आहे.त्यामुळे सिनेमाने विकेंडमध्ये नेमक्या किती कोटीचा गल्ला जमवला आहे? हे जाणून घेऊयात. (dharmveer 2 box office collection day 3 biggest marathi opening by beating narava majha navasacha 2 movie)
ADVERTISEMENT
प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक आणि क्षितीश दाते यांची प्रमुख भूमिका असलेला आणि प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 सिनेमा हा 27 सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने विकेंडमध्ये 7.92 कोटीची कमाई केली आहे. ही कमाई करत धर्मवीर सिनेमाने अभिनेता सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाला मागे टाकले आहे. नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाने 7.84 कोटीची कमाई केली होती. त्यामुळे धर्मवीर सिनेमाने विकेंडमध्येच 7.92 कोटीची कमाई करत नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाला मागे टाकले आहे.
हे ही वाचा : Dharmaveer-2 सिनेमाची संपूर्ण कहाणी, शिंदे-ठाकरेंमध्ये तेव्हा नेमकं काय घडलेलं?
धर्मवीर 2 सिनेमाने 1.92 कोटींची कमाई करून मराठीतली सर्वांत मोठी ओपनिंग केली होती. याआधी रितेश देशमुखच्या वेड सिनेमाने 2.25 कोटीची कमाई केली होती. तर धर्मवीरने 2.05 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे आता कोविड नंतरच्या काळात मराठी चित्रपटातली ही तिसरी सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे.
हे वाचलं का?
धर्मवीरने 2 ने पहिल्याच दिवशी ओपनिंगला 1.92 कोटीचा गल्ला जमवत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी धर्मवीरने 2.53 कोटीची कमाई केली होती. आणि तिसऱ्या दिवशी धर्मवीरने 3.47 करोडचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अशाप्रकारे धर्मवीरने पहिल्याच विकेंडमध्ये 7.92 कोटींची कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार धर्मवीर 2 सिनेमा हा 8 कोटीच्या बजेटमध्ये बनला होता. हे बजेट आता वसूल झाल्यात जमा झाले आहे. कारण सिनेमाने 7.92 कोटीची कमाई केली आहे. आणखीण 8 लाख रूपये सिनेमाला कमवायचे आहेत. हे कमावल्यानंतर सिनेमा बजेटचे पैसे वसूल करणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Dharmveer 2 Collection : 'धर्मवीर 2' ने सगळेच रेकॉर्ड मोडले, पहिल्या दिवशी जमवला 'इतक्या' कोटीचा गल्ला
दरम्यान धर्मवीर 2 सिनेमाने सध्या पहिल्या विकेंडमध्ये 7.92 कोटीची कमाई केली आहे. आता दुसऱ्या आठवड्यात 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. त्यात पुन्हा नवरात्री सूरू होतं आहे. त्यामुळे दुसऱ्या विकेंडमध्ये धर्मवीर 2 चा गल्ला आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT