Bigg Boss Marathi : अंकिता घराबाहेर जाता जाता राहिली, 'वंडर गर्ल' बिग बॉसमधून एलिमिनेट
Varsha Usagaonkar Eliminate : बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिंल्यादाच मिड विक इविक्शन पार पडलं आहे. यामध्ये वंडर गर्ल वर्षा उसगांवकर या एलिमिनेट झाल्या आहे. सकाळपासू सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर एलिमिनेट होईल अशी चर्चा होती. त्याप्रमाणे अंकिता एलिमिनेशनच्या अंतिम टप्प्यात होती देखील.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
वर्षा उसगांवकरांनी घराचा घेतला निरोप
अंकिता ठरली सहावी फायनलीस्ट
हे सहा सदस्य पोहोचले फायनलमध्ये
Varsha Usagaonkar Eliminate : बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिंल्यादाच मिड विक इविक्शन पार पडलं आहे. यामध्ये वंडर गर्ल वर्षा उसगांवकर या एलिमिनेट झाल्या आहे. सकाळपासून सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर एलिमिनेट होईल अशी चर्चा होती. त्याप्रमाणे अंकिता एलिमिनेशनच्या अंतिम टप्प्यात होती देखील. पण एलिमिनेशने तिला हुलकावणी दिली आहे आणि वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. (varsha usgaonkar eliminate in mid week eviction ankita walawalkar safe bigg boss marathi season 5)
ADVERTISEMENT
अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर असे सहा सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट ठरले आहेत. या सदस्यांपैकी एक सदस्य आज मीड वीक इविक्शनमध्ये घराबाहेर पडणार होता. या सदस्यांपैकी निक्की तांबोळीने 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे ती यंदाच्या ग्रँड फिनालेमध्ये जाणारी पहिली सदस्य ठरली होती.
हे ही वाचा : Rajinikanth Admitted to Hospital: सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल, एका रात्रीत असं काय घडलं?
निक्की पाठोपाठ प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार गायक अभिजीत सावंत यंदाचा दुसरा फायनलिस्ट ठरला आहे. अभिजीत नंतर तिसऱ्या क्रमांकावर धनंजय पोवारने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली आहे. धनंजय यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर जान्हवी किल्लेकरने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. तर पाचव्या क्रमांकावर सूरज चव्हाण याने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री मारली होती.
हे वाचलं का?
टॉप-5 स्पर्धकांची घोषणा केल्यावर घरात मिडवीक एविक्शन पार पडलं. अंकिता आणि वर्षा बॉटम – 2 स्पर्धक होत्या. शेवटी ‘बिग बॉस’ने सहाव्या फायनलिस्टच्या नावाची घोषणा करत अंकिता वालावलकरचं नाव जाहीर केलं आणि वर्षा उसगांवकरांचा घरातील प्रवास 67 दिवसांनी संपला. अशाप्रकारे वंडर गर्ल वर्षा उसगांवकर यांनी घराचा निरोप घेतला.
हे ही वाचा : Dharmveer 2 Collection : 'नवरा माझा नवसाचा 2' सिनेमाला टाकलं मागे, विकेंडमध्ये 'धर्मवीर'ने कमावले 'इतके' कोटी?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT