sakinaka Rape case : त्याला सगळी सूट देऊया! काय?; अभिनेत्री हेमांगी कवीचा सवाल

मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेवर व्यक्त केली चीड; हेमांगीची फेसबुक पोस्ट पुन्हा चर्चेत
अभिनेत्री हेमांगी कवी.
अभिनेत्री हेमांगी कवी. instagram

समाजातील विविध विषय आणि घटनांवर अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. मुंबईतील साकीनाका येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेवर चीड व्यक्त करत हेमांगीने प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून क्रूरपणे अत्याचार करण्यात आला. या घटनेतील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं समाजमन सुन्न झालं असून, संताप आणि चीड व्यक्त होत आहे.

विविध राजकीय पक्ष, नेत्यांसह नागरिक या घटनेवर संताप व्यक्त करत असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या घटनेवर अभिनेत्री हेमांगी कवी हिनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री हेमांगी कवी.
Sakinaka Rape Case "मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता..." मनसे संतापली

हेमांगी कवी काय म्हणाली?

'आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, single होती, divorcee होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार! चला आता आपण तिलाच आणखीन घाबरवून ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?', असा सवाल करत हेमांगी कवीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'त्या' रात्री काय घडलं?

साकीनाका या ठिकाणी खैरानी रोडवर एक पुठ्ठ्याची कंपनी आहे, तिथल्या वॉचमनने 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री साधारणतः सकाळी तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रूमला फोन केला. एका महिलेला रस्त्यावर मारहाण होत असल्याची माहिती त्याने दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आलं. दहा मिनिटांच्या आत पोलीस पोहचले. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोच्या आतमध्ये पीडित महिला अत्यंत भयंकर अवस्थेत आढळून आली.

अभिनेत्री हेमांगी कवी.
भयंकर! रेल्वे स्थानकातून नेलं निर्जनस्थळी; उल्हासनगर स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पोलिसांनी वेळ न दवडता या टेम्पोची चावी घेतली आणि महिलेला राजावडी रूग्णालयात दाखल केलं. या महिलेवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. चौकीदाराच्या तक्रारीवरून साकीनाका पोलीस ठाण्यात कलम 307 आणि 376 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर नेमकं काय घडलं हे समोर आलं. आरोपीने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या गुप्तांगात रॉड टाकला. हे सगळं सीसीटीव्ही फूटेजमधून समोर आलं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in