Seema Deo Death: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड! - Mumbai Tak - senior actress seema dev passed away at the age of 81 - MumbaiTAK
बातम्या बॉलिवूड मनोरंजन मराठी सिनेमा

Seema Deo Death: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड!

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं आहे. त्या 81 वर्षाच्या होत्या. सीमा देव यांनी गुरुवारी (24 ऑगस्ट 2023) सकाळी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरचा आजार होता.

Seema Deo Passed Away : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं आहे. त्या 81 वर्षाच्या होत्या. सीमा देव यांनी गुरुवारी (24 ऑगस्ट 2023) सकाळी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरचा आजार होता. मुलगा अभिनय देवसोबत त्या वांद्रे येथे राहत होत्या. (Senior actress Seema Dev passed away at the age of 81)

त्यांनी विविध चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमा देव यांच्या पार्थिवावर गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

India Alliance : मुंबईतील बैठकीत विरोधक दोन गोष्टी ठरवणार, काय आहे अजेंडा?

सीमा देव यांचा विवाह अभिनेता रमेश देव यांच्याशी झाला होता. रमेश देव यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. रमेश देव यांचं 2 फेब्रुवारी 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 93 वर्षांचे होते.

‘आनंद’ चित्रपटात सीमा देव यांची होती खास भूमिका!

रमेश देव यांनी ‘आनंद’मध्ये अमिताभ बच्चन यांचा मित्र डॉ. प्रकाश कुलकर्णी यांची भूमिका केली होती. त्या चित्रपटात सीमा देव त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत होत्या. अमिताभ बच्चन त्यांना चित्रपटात भाभी म्हणून हाक मारायचे.

छत्रपती संभाजीनगर : आईनेच 20 वर्षाच्या लेकीला पेटवले, कारण ऐकून पोलिसही हादरले

80 हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम

सीमा देव यांनी आपल्या करिअरमध्ये 80 हून अधिक हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचं खरं नाव नलिनी सराफ होतं. 1960 मध्ये ‘मियाँ बीवी रझा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्या ‘भाभी की चुडियाँ’, ‘दस लाख’, ‘कोशिश’, ‘कोरा कागज’, ‘संसारा’ आणि ‘सुनहरा संसार’ आणि ‘सरस्वतीचंद्र’ या हिट चित्रपटांमध्ये दिसल्या.

Brown, Whole Wheat, Multigrain Bread : ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं की हानिकारक?

सीमा देव यांची मुलं काय करतात?

सीमा देव आणि रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव अशी दोन मुलं आहेत. अभिनय हा दिग्दर्शक असून त्याने ‘डेल्ही बेली’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. तर मुलगा अजिंक्य हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.

World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?