समीर वानखेडेवर छापा पडताच शाहरुख खानचं ‘ते’ ट्विट होतंय प्रचंड व्हायरल
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीच्या ज्या टीमने छापा मारून अटक केली होती, त्या टीमचे नेतृत्व समीर वानखेडे करत होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यामुळे आता ते अडचणीत आहेत.
ADVERTISEMENT

CBI action against Sameer Wankhede updates : एनसीबीचे मुंबईचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सीबीआयने त्याच्या घरासह विविध ठिकाणी छापेमारी केली. समीर वानखेडे हे मुंबईतील एनसीबीचे झोनल चीफ होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीकडून ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर ही अटक करण्यात आली. समीर वानखेडे या छापा टाकणाऱ्या पथकाचे नेतृत्व करत होते. पुढे न्यायालयाने या प्रकरणात आर्यन खानची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर समीर वानखेडेंचीही बदली झाली. पण, आता समीर वानखेडेंचे खंडणी प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच शाहरुख खानचे एक जुने ट्विट व्हायरल होऊ लागले. ज्यामध्ये शाहरुखने ज्याला तुम्ही पात्र आहात, ते तुम्हाला मिळेल, असे म्हटलेलं आहे.
पठाण चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी शाहरुखने ट्विटरवर #AskSRK म्हणत चाहत्यांशी संवाद साधला होता. युसरा नावाच्या युजरने यावर कमेंट केली होती की, “एक मजेदार आणि मूर्ख विनोद सांगा !!”
हेही वाचा >> Aryan Khan: शाहरुखच्या मुलाला तुरुंगात पाठवणारे समीर वानखेडेच अडकले CBI च्या जाळ्यात
शाहरुख खानला त्याच्या विनोदी उत्तरांसाठीही ओळखलं जातं. पण याला उत्तर देताना मात्र तो गंभीर झाला होता. शाहरुख खानने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “कर्मा नावाचे एक नवीन रेस्टॉरंट आहे. तिथे कोणताही मेनू नाही. तुम्ही ज्याला पात्र आहात ते तुम्हाला मिळेल.”
There’s a new restaurant called Karma. There’s no menu. You get what you deserve. https://t.co/p4t3wmOI1h
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 20, 2023