शिल्पा शेट्टी-राज कुंद्रानं शर्लिन चोप्राविरुद्ध दाखल केला 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा!

विद्या

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी शर्लिन चोप्राने मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून, तिने राज कुंद्रा बलात्कार, लैगिंक शोषणासह फसवणुकीचे आरोप केले आहेत. शर्लिन चोप्राने केलेल्या आरोपानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी शर्लिन चोप्राने मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून, तिने राज कुंद्रा बलात्कार, लैगिंक शोषणासह फसवणुकीचे आरोप केले आहेत. शर्लिन चोप्राने केलेल्या आरोपानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरुद्ध 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याचबरोबर शर्लिन चोप्राने केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मुख्यमंत्रीजी, मी तुमच्या मुलीसारखी, मला मदत करा; शर्लिन चोप्राने उद्धव ठाकरेंना जोडले हात

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्राने एक व्हिडीओ ट्वीट करत शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. तिने या व्हिडीओमध्ये घटनाक्रम सांगितला होता. तसेच जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रकरणाचा तपास सुरू करण्याची विनंती केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp