आमिर खान मायानगरीला कंटाळला? चित्रपट सोडून नेपाळ गाठत विपश्यना केंद्रात दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Aamir Khan attend Meditation Program Vipassana Center nepal
Aamir Khan attend Meditation Program Vipassana Center nepal
social share
google news

Aamir Khan attend Meditation Program Vipassana Center : बॉलिवूडमध्ये वर्षातून एक सिनेमा बनवणाऱ्या मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) आता बॉलिवूड़मधून (Bollywood) ब्रेक घेतल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या 5 वर्षात आमिर खानने दोन सिनेमे बनवले होते, आणि हे दोन्हीही फ्लॉप ठरले होते. त्यामुळे सततच्या या फ्लॉप सिनेमानंतर आमिर खानने अध्यात्मिकतेची वाट धरली आहे. आमिरने थेट नेपाळ गाठत विपश्यना केंद्रात दाखल झाला आहे. या केंद्रात तो ध्यान (मेडिटेशन) करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मिस्टर पर्फेक्शनिस्ट अध्यात्मिकतेकडे वळल्याची चर्चा सुरु झाली आहे. (aamir khan in nepal for meditation program vipassana center actor quit bollywood)

आमिर खानने (Aamir Khan) बॉलिवूडमधून (Bollywood) ब्रेक घेतला आहे. हा ब्रेक घेऊन आमिरने थेट रविवारी नेपाळ गाठलंय. नेपाळमध्ये आमिर खान बुद्धानिकांथाच्या विपश्यना केंद्रात राहणार आहे. या केंद्रात आमिर खान 10 दिवसांचे ध्यान (मेडिटेशन) प्रोग्राम अटेंड करणार आहे. आता तो या विपश्यना केंद्रात एकटा गेला की त्याच्या कुटुंबासोबत गेलाय याची माहिती समोर आली नाही आहे.

हे ही वाचा : The kerala story बॉक्स ऑफिसवर सुसाट! दोनच दिवसांत कोट्यवधींची कमाई

सिनेमे ठरतायत फ्लॉप

आमिर खान (Aamir Khan) गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरतोय, त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी अशी कमाल दाखवू शकले नाहीयेत.आमिर खानचा गेल्या वर्षी 11 ऑगस्ट 2022 ला लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha)हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला होता. याआधी कोविडच्या काळात देखील आमिर खानचा एकही सिनेमा आला नव्हता. कोविड आधी आमिरचा 8 नोव्हेंबर 2018 ला ठग्स ऑफ हिंदूस्थान हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर आपटला होता. गेल्या 5 वर्षात आमिरने 2 सिनेमे बनवले होते, हे दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बॉलिवूडमधून ब्रेकची घोषणा

लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) सिनेमाच्या रिलीजनंतर आमिर खानने (Aamir Khan) सिनेमातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती.आणि सिनेमा प्रोड्यूस करण्याच्या विचारात असल्याची माहिती दिली होती. आमिर सध्या आर.एस. प्रसन्नाची फिल्म चॅ्म्पियन प्रोड्यूस करत आहे. तसेच आमिरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, तो गजनी सिनेमाच्या मेकर्सच्या संपर्कात आहे. गजनी सिनेमाच्या सिक्वल बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.यासोबत आमिर खान केजीएफ सिनेमाचा फिल्म डायरेक्टर प्रशांत नीलशी सिनेमावर चर्चा करत असल्याची माहिती आहे. आमिर खान जुनियर एनटीआर सोबत प्रशांत नीलच्या सिनेमात इंटरेस्ट दाखवत आहे.

हे ही वाचा : The Kerala Story : बलात्कार, आत्महत्या अन् शिरच्छेद… सीन कसे झाले शूट?

मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खान लवकरच स्पाय युनिव्हर्समध्ये सामील होणार आहे. आमिर खान वायआरएफसोबत सिनेमा करणार आहे,अशी देखील चर्चा आहे. जर असे झाले तर, शाहरूख खान नंतर आमिर खान स्पाय थ्रिलर सिनेमासोबत मोठ्या पडद्यावर फॅन्सना आश्चर्यचकीत करणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT