The Family Man 2 वेबसिरीजच्या वादावरून अभिनेता मनोज वाजपेयीने सोशल मिडीयावर जाहीर केलं निवेदन, वादावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई तक

‘द फॅमिली मॅन 2’ ही वेब सीरीज काही दिवसांपासून बरीच वादात अडकली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शोमध्ये तमिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखविल्याचा आरोप केला जात आहे., या सीरीजमध्ये श्रीलंकेत आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या तामिळ बंडखोरांना आयएसआयएसशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आले आहे. तमिळनाडूच्या मंत्र्यांनीही या सीरीजवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. आता मात्र या वेबसीरीजचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘द फॅमिली मॅन 2’ ही वेब सीरीज काही दिवसांपासून बरीच वादात अडकली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर शोमध्ये तमिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखविल्याचा आरोप केला जात आहे., या सीरीजमध्ये श्रीलंकेत आपल्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या तामिळ बंडखोरांना आयएसआयएसशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आले आहे. तमिळनाडूच्या मंत्र्यांनीही या सीरीजवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. आता मात्र या वेबसीरीजचा निर्माता आणि मुख्य अभिनेता मनोज वाजपेयी याने सोशल मिडीयावर यासंदर्भात एक स्टेटमेंट जारी केलं आहे. निर्मात्यांचे निवेदन पुन्हा पोस्ट करताना मनोजने संपूर्ण टीमच्या वतीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लिहिले की, ‘ट्रेलरचे काही शॉट्स पाहिल्यानंतर सीरीजबद्दल अनेक गृहितक तयार केली जात आहेत. आमच्या शोमधील बरेच कलाकार, क्रिएटिव टीमचे आणि लेखक टीमचे मेंबर्स तामिळ आहेत. आम्हाला तामिळ लोक आणि तामिळ संस्कृतीबद्दल माहित आहे आणि आम्ही तामिळ लोकांचा खूप आदर करतो. त्यांच्यावर प्रेम करतो.’

या निवेदनात पुढे असे लिहिले आहे की, ‘आम्ही बर्‍याच वर्षांपासून या सीरीजसाठी कठोर परिश्रम घेतले आहेत आणि आम्ही प्रेक्षकांसमोर एक संवेदनशील, संतुलित कहाणी या शोच्या पहिल्या सीझनमधून आणली आहे. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, आपण प्रतीक्षा करा आणि शो प्रदर्शित होऊ द्या. आम्ही आशा करतो की, सीरीज पाहिल्यानंतर आपण त्याचे नक्की कौतुक कराल.’ट्रेलर रिलीज झाल्यापासून लोक समांथावरही आपला संताप व्यक्त करत आहेत. ही सीरीज करून समांथाने चूक केल्याचे, लोक म्हणत आहेत. या सीरीजचा तिच्या कारकीर्दीवर देखील प्रभाव पडू शकतो. ‘द फॅमिली मॅन 2’ मनोज बाजपेयी राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये काम करणाऱ्या ‘श्रीकांत तिवारी’ची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी हा सीझन फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे त्याची रिलीज लांबणीवर पडली. आता ही सीरीज 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मनोज बाजपेयी, समांथा, सीमा बिस्वास, शरद केळकर, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, शहाब अली आणि वेदांत सिन्हादेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp