आईच्या आठवणीत अभिनेत्री जान्हवी कपूर भावूक
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचं आज 3 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवीचं निधन झालं. श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने आईच्या आठवणीत खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट करताना जान्हवीने मिस यू असं कॅप्शनंही दिलं आहे. View this post on Instagram A post shared by […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचं आज 3 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवीचं निधन झालं. श्रीदेवीच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने आईच्या आठवणीत खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट करताना जान्हवीने मिस यू असं कॅप्शनंही दिलं आहे.
श्रीदेवीसाठी जान्हवीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. श्रीदेवीने जान्हवीसाठी लिहिलेल्या एका लेखी नोटचा फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये, आय लव्ह यू माझी लब्बू…तु जगातील सर्वात बेस्ट बेबी आहेस. या पोस्टद्वारे जान्हवीने ती आपल्या आईला खूप मिस करत असल्याचं म्हटलंय.
तर जान्हवीची बहिण खूशी कपूर हिनेही आईच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केलीये. खूशीने इन्स्टाग्रामवरून आई श्रीदेली आणि वडील बॉनी कपूर यांचा फोटो शेअर केला आहे. या पोटोमध्ये श्रीदेवी आणि बॉनी कपूर हे दोघंही काळ्या कपड्यांमध्ये एका तलावाजवळ उभं असल्याचं दिसून येतंय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
2018 साली दुबईमध्ये श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला होता. श्रीदेवी तिचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी दुबईला गेली होती. त्याचठिकाणी हॉटेलमध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण देश हादरला होता. श्रीदेवीने हिम्मतवाला, चांदनी, सदमा, नगीना, लम्हे तसंच चालबाज या सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
ADVERTISEMENT