अभिनेत्री वैशाली ठक्करला बॉयफ्रेंड देत होता त्रास? सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैशालीने आत्महत्या केली आहे. इंदूर येथील राहत्या घरी तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. बातमीनुसार, वैशालीच्या घरातून एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलिस आत्महत्येचे कारण शोधत आहेत. एसीपी एम.रहमान यांनी सांगितले की, अभिनेत्रीच्या सुसाइड नोटमध्ये एक्स बॉयफ्रेंडचा उल्लेख आढळला आहे.

ADVERTISEMENT

शनिवारी रात्री केली आत्महत्या

अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती इंदूरच्या तेजाजी नगर पोलीस ठाण्यातून मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटनुसार ती अस्वस्थ होती. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत होता. वैशालीचे प्रेमसंबंध होते ते संपल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सुसाईड नोटमध्ये एका व्यक्तीचे नावही घेण्यात आले आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वैशाली ठक्करचा मृतदेह ताब्यात घेतला. वैशालीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली. अभिनेत्री वैशाली ठक्करने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ससुराल सिमर का’सह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

वैशाली ही टीव्हीची प्रसिद्ध स्टार होती

ADVERTISEMENT

वैशाली ठक्करच्या टीव्हीवरील करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१५ मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही तिची पहिली मालिका होती. यामध्ये ती संजनाच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर वैशालीने ‘ये है आशिकी’ शोमध्ये काम केले. ती आणखी एका लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का’ शोमध्येही दिसली होती. येथे ती अंजली भारद्वाजच्या भूमिकेत होती. याच शोमुळे तिला इंडस्ट्रीत ओळख मिळाली.याशिवाय वैशाली ठक्कर ‘सुपर सिस्टर’, ‘मनमोहिनी सीझन 2’ आणि ‘रक्षा बंधन’मध्ये दिसली होती.

ADVERTISEMENT

वैशालीची एंगेजमेंट मोडली होती

समोर आलेल्या माहितीनुसार, वैशाली ठक्करने एप्रिल 2021 मध्ये एंगेजमेंट केली होती. तिच्या रोका सोहळ्याचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांना एंगेजमेंटची गुड न्यूज देताना ती खूप खूश होती. वैशालीच्या एंगेजमेंटला तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र, महिनाभरानंतर ही एंगेजमेंट तुटली. वैशालीने तिची एंगेजमेंट रद्द केल्याचे बोलले जात आहे. तिने यापुढे तिच्या मंगेतरशी लग्न करणार नसल्याचे सांगितले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT