अभिनेत्री विशाखा सुभेदार आता बनणार निर्माती
अभिनेत्री विशाखा सुभेदारने नेहमीच आपली चांगली छाप पाडलीये. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार आता निर्माती बनणार आहे. विशाखा सुभेदार अणि पूनम जाधव ‘प्रग्यास क्रिएशन्स’ या नाट्य संस्थेच्या माध्यमातून नाट्यनिर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकत आहेत. त्यामुळे आता अभिनयानंतर निर्मिती क्षेत्राकडे विशाखाचा नवा प्रवास सुरु होणार आहे. लवकरच रंगभूमीवर प्रग्यास क्रिएशन्स आणि व्ही.आर. प्रोडकशन्स ह्या नाट्यसंस्थेचं ‘कुर्रर्रर्रर्र’ हे […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री विशाखा सुभेदारने नेहमीच आपली चांगली छाप पाडलीये. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार आता निर्माती बनणार आहे. विशाखा सुभेदार अणि पूनम जाधव ‘प्रग्यास क्रिएशन्स’ या नाट्य संस्थेच्या माध्यमातून नाट्यनिर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकत आहेत. त्यामुळे आता अभिनयानंतर निर्मिती क्षेत्राकडे विशाखाचा नवा प्रवास सुरु होणार आहे.
लवकरच रंगभूमीवर प्रग्यास क्रिएशन्स आणि व्ही.आर. प्रोडकशन्स ह्या नाट्यसंस्थेचं ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक येतंय. 16 फेब्रुवारी रोजी या नाटकाचा मुहूर्त पार पडला. या नाटकाचं लिखाण तसंच दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केलंय.