Adipurush: …तरीही ‘आदिपुरुष’ने पहिल्याच दिवशी कमावले 150 कोटी, हे कसं घडलं?

मुंबई तक

Adipurush Box office Collection Day 1 : बहुप्रतिक्षित आदिपुरुष (Adipurush) हा बिग बजेट सिनेमा शुक्रवारी 16 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये तब्बल 6.200 स्क्रिनवर रिलीज झाला.

ADVERTISEMENT

adipurush box office day 1 collection reaches 150 crore worldwide prabhas saif ali khan
adipurush box office day 1 collection reaches 150 crore worldwide prabhas saif ali khan
google news

Adipurush Box office Collection Day 1 : बहुप्रतिक्षित आदिपुरुष (Adipurush) हा बिग बजेट सिनेमा शुक्रवारी 16 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये तब्बल 6.200 स्क्रिनवर रिलीज झाला. फक्त हिंदीतच हा सिनेमा 4000 स्क्रिनवर प्रदर्शित झाला. त्यामुळे या सिनेमाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. (adipurush box office day 1 collection reaches 150 crore worldwide prabhas saif ali khan)

आदिपुरूष (Adipurush) हा सिनेमा सुरुवातीपासूनच वादात होता. सिनेमात रावणाच्या दाखवलेल्या लुकमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. या ट्रोलिंगनंतर सिनेमात बदल करण्यात आला होता. हा बदल थेट ट्रेलरमध्ये न दाखवता सिनेमात दाखवण्यात आला होता,त्यामुळे रावणाचा हा बदलेला लुक चाहत्यांना आवडेल अशी अपेक्षा होती. मात्र तरी देखील रावणाच्या लुकवरून ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर अनेक प्रेक्षकांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. अशा अनेक चित्रपट प्रेमींच्या प्रतिक्रिया आहेत. या सिनेमातील डायलॉग आणि व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे आणि रावणाचा अवतार यावरून देखील टीका होतेय. तरी देखील काही चित्रपटप्रेमींना हा सिनेमा आवडला आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडे स्वप्नवत कलाकार आणि प्रचंड बजेट होते, पण आदिपुरूष सिनेमाने महाकाय निराशा केली आहे, असे ट्विट प्रसिद्द समीक्षक तरण आदर्श यांनी केली आहे. या सिनेमाला त्यांनी वन अॅड हाफ स्टार दिला आहे.

हे ही वाचा : रणबीर कपूरने अ‍ॅनिमलसाठी घेतले ”इतके” कोटी, कमाईत अनिल कपूरलाही टाकले मागे

हे वाचलं का?