अक्षय कुमारच्या पृथ्वीराज सिनेमाच्या अडचणी वाढल्या.ओमान आणि कुवेतमध्ये सिनेमावर बंदी. नेमकं काय आहे कारण?
अक्षय कुमारच्या आगामी सम्राट पृथ्वीराज सिनेमासमोरील अडचणी काही केल्या कमी होत नाहीये. पृथ्वीराज सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा काही ना काही कारणामुळे वादातच सापडला आहे. आता सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होत असताना एक दिवस आधीच अजून एक बातमी समोर आली आहे. सम्राट पृथ्वीराज ओमान,कुवेत मध्ये सिनेमावर बंदी आणली गेली आहे. सिनेमाशी संबंधित काही सूत्रांनी ही […]
ADVERTISEMENT
अक्षय कुमारच्या आगामी सम्राट पृथ्वीराज सिनेमासमोरील अडचणी काही केल्या कमी होत नाहीये. पृथ्वीराज सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा काही ना काही कारणामुळे वादातच सापडला आहे. आता सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होत असताना एक दिवस आधीच अजून एक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
सम्राट पृथ्वीराज ओमान,कुवेत मध्ये सिनेमावर बंदी आणली गेली आहे. सिनेमाशी संबंधित काही सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. अद्याप या ओमान,कुवेतमध्ये सिनेमावर बंदी का आणली याविषयी मात्र कोणतेही कारण समोर आलेले नाही.मी़डियाला मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाला ओमान,कुवेतमध्ये बंदी केलं गेल्याची बातमी आहे. पण अद्याप याविषयी अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं नाही.
सिनेमाच्या टीमनं देखील याविषयीच्या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. भारताचा शेवटचा हिंदू सम्राट म्हणून ओळखले जाणारे पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत हा ऐतिहासिक सिनेमा ३ जून,२०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.काही दिवसांपूर्वी हा सिनेमा एका वेगळ्याच कारणानं वादात पडला होता. राजपूत करणी सेनेनं या सिनेमाचं टायटल बदलण्याची मागणी केली होती. करणी सेनेनं धमकी दिली होती की जर सिनेमाचं नाव बदललं नाही तर तो राजस्थान मध्ये प्रदर्शित करु दिला जाणार नाही. त्यानंतर २७ मे ला सिनेमाच्या टीमनं ‘पृथ्वीराज’ नाव बदलून या सिनेमाचं नाव ‘सम्राट पृथ्वीराज’ केल्याचं जाहिर केलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT