बिग बी यांच्यावर झाली शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतर म्हणाले…
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं समोर आल्यावर फॅन्स धास्तावले होते. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता बिग बी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांनी फॅन्सचे आभार मानलेत. अमिताभ बच्चन यांनी पुन्हा ब्लॉगद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणालेत, “माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी तसंच प्रेमासाठी धन्यवाद…या वयात […]
ADVERTISEMENT
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं समोर आल्यावर फॅन्स धास्तावले होते. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता बिग बी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांनी फॅन्सचे आभार मानलेत.
ADVERTISEMENT
अमिताभ बच्चन यांनी पुन्हा ब्लॉगद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणालेत, “माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी तसंच प्रेमासाठी धन्यवाद…या वयात डोळ्यांची शस्त्रक्रिया करणं नाजूक असतं. आशा करतो लवकरच सर्व काही ठीक होईल.” या ब्लॉगसोबत अमिताभ यांनी त्यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या कानावर पट्टी दिसून येतेय.
हे वाचलं का?
शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे ‘मेडिकल कंडीशन, सर्जरी, आता लिहू शकत नाही…’ असं म्हटलं होतं. अमिताभ यांच्या या छोट्या वाक्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अमिताभ यांचा ब्लॉग पाहिल्यानंतर फॅन्सने लगेच त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली होती. शिवाय त्यांच्या एका ट्विटमुळेही चाहते संभ्रमात पडले होते. ट्विटरच्या पोस्टमध्ये त्यांनी केवळ प्रश्नार्थक चिन्ह लिहीली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दरम्यान अमिताभ यांनी त्यांचा झुंड हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचसोबत चेहरे हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ यांनी या दोन्ही सिनेमांचं पोस्टर सोशल मिडीयावरून शेअर केलं होतं. तर बिग बी ब्रम्हास्त्र या सिनेमातून देखील प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT