अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ यांची भावनिक पोस्ट
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा आज वाढदिवस आहे. अभिषेक आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे चाहते सोशल मिडीयावरून शुभेच्छा देतायत. तर अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी अभिषेकसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. View this post on Instagram A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा आज वाढदिवस आहे. अभिषेक आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे चाहते सोशल मिडीयावरून शुभेच्छा देतायत. तर अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी अभिषेकसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
ADVERTISEMENT
यामध्ये अमिताभ यांनी अभिषेक सोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये अभिषेक अमिताभ यांचा हात पकडून चालतोय. तर दुसऱ्या फोटोमध्ये अमिताभ यांनी अभिषेकचा हात पकडल्याचं दिसतंय. या फोटोंना कॅप्शन देताना अमिताभ लिहीतात, एका काळात मी त्याचा हात पकडायचो…तर आता तो माझा हात पकडून मला आधार देतोय.
अमिताभ यांनी शेअर केलेली भावूक पोस्ट सोशल मिडीयावर खूप व्हायरल झालीये. लोकांनी या पोस्टला भरभरून लाईक्स दिले आहेत. शिवाय अभिषेक बच्चनने देखील लव्ह यू पा असा रिप्लाय दिला आहे. या पोस्टरून अमिताभ आणि अभिषेक यांच्यात एक चांगलं बाँडींग असल्याचं दिसून येतंय.
हे वाचलं का?
दरम्यान नुकतंच अभिषेक बच्चन याची ‘ब्रिथ- इंटु द शॅडो’ ही वेबसिरीज आली होती. सस्पेंस थ्रिलर अशी ही वेबसिरीज असून प्रेक्षकांनी या सिरीजला चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान अमिताभ बच्चन हे आगामी झुंड, चेहरे तसंच ब्रम्हास्त्र या सिनेमांमध्ये झळकणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT