Mukesh Ambani Guest: मुलाच्या लग्नासाठी अंबानींनी 'या' नेत्यांना दिलं आमंत्रण, ही पाहा पाहुण्यांची यादी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ही पाहा मुकेश अंबानींच्या पाहुण्यांची यादी
ही पाहा मुकेश अंबानींच्या पाहुण्यांची यादी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचं 12 जुलैला लग्न

point

लग्नासाठी जगभरातून येणार पाहुणे

point

पाहा मुकेश अंबानींनी कोणाकोणाला दिलं लग्नांचं आमंत्रण

Mukesh Ambani Guest list: मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत 12 जुलैला (Anant-Radhika Wedding) लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान, याच लग्न सोहळ्यासाठी मुकेश अंबानींनी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. त्यानुसार अंबानी कुटुंबीयांच्या या कार्यक्रमात बॉलिवूडपासून राजकीय जगतातील बड्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय विदेशातून अंबानींचे खास पाहुणेही या लग्नात सहभागी होणार आहेत. (anant radhika wedding ambani invited many political leaders for his son wedding see mukesh ambani guest list)

ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रण

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी केवळ बॉलीवूड स्टार्सनाच नाही तर राजकीय जगतातील बड्या व्यक्तींनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. अनंत-राधिका यांना आशीर्वाद देण्यासाठी ठाकरे कुटुंबीयशिवाय (Thackeray Family) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय अंबानी कुटुंबाकडून सर्व पक्षाच्या दिग्गज नेत्यांना लग्नाची निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

हे ही वाचा >> Ambani: अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात; अंबानी-मर्चंट कुटुंबीयांची धमाल-मस्ती!

परदेशी पाहुण्यांनाही निमंत्रण

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूड, व्यावसायिक क्षेत्र, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा समावेश आहे. जर आपण अंबानींच्या परदेशी पाहुण्यांची यादी पाहिली, तर यामध्ये क्रीडा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम यांचा समावेश आहे. कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेक (Drake), अमेरिकन गायिका लाना डेल रे (Lana Del Rey) आणि ॲडेल  (Adele) हे लग्नासाठी मुंबईला पोहोचू शकतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रिपोर्टनुसार, अंबानींच्या वतीने अमेरिकन रिॲलिटी स्टार किम कार्दशियनचा मेकअप आर्टिस्ट, मारियो डेडिव्हानोविक, यूएस टिकटॉकर आणि कंटेंट क्रिएटर ज्युलिया चाफे आणि हेअर स्टायलिस्ट क्रिस ॲपलटन यांनाही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Ambani Family Announce Mass Wedding : अनंत-राधिका यांच्याआधी अंबानी कुटुंब 'यांचे' करणार लग्न

'या' बॉलिवूड दिग्गजांना आमंत्रण

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, जर आपण अंबानींच्या पाहुण्यांची यादी पाहिली तर त्यात अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात अमिताभ बच्चनपासून (Amitabh Bachchan) ते किम कार्दशियनच्या मेकअप आर्टिस्टपर्यंत सर्वांचा समावेश आहे. याशिवाय शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या भव्य सोहळ्याला येणार आहेत.

ADVERTISEMENT

अनंत-राधिकाचा विवाह सोहळा 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार असून, तो तीन दिवस चालणार आहे. या भव्य विवाह सोहळ्याचे अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी मुकेश अंबानी यांनी लॉस एंजेलिस येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि कॅमेरा पर्सन यांना बोलावलं आहे. एवढेच नाही तर अंबानींनी आमंत्रित केलेल्या परदेशी पाहुण्यांसाठी खासगी जेटची व्यवस्था असून या कार्यक्रमाचा ड्रेस कोड भारतीय फॉर्मल ठेवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT