Ankita Lokhande : ”माझ्यासोबत एक रात्र झोप…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ankita lokhande bigg boss 17 contestant face two time casting couch experience vicky jain bollywood entertainment
ankita lokhande bigg boss 17 contestant face two time casting couch experience vicky jain bollywood entertainment
social share
google news

Ankita Lokhande Casting Couch Experience : प्रसिद्ध टीव्ही शो ‘पवित्र रिश्ता’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या रिअ‍ॅलिची शोचा भाग आहे. या शोमध्ये तिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा (Casting Couch)  अनुभव सांगितला आहे. अंकिताला दोनदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. या दरम्यान तिच्यासोबत काय-काय घडलेले, हा संपूर्ण प्रसंग तिने सांगितला आहे. (ankita lokhande bigg boss 17 contestant face two time casting couch experience vicky jain bollywood entertainment)

अंकिता लोखडेला (Ankita Lokhande) एक नव्हे तर दोनदा अशा भयंकर अनुभवातून जावे लागले. अंकिता 19-20 वर्षाची असताना तिला पहिल्यांदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. अंकिताने तिच्या करिअरची सुरूवात केली होती, त्यावेळेस तिच्याकडे एका दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर आली होती. या चित्रपटासाठी तिला तडजोड करण्यास सांगितले गेले होते.

हे ही वाचा : Crime : संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; तरूणासोबत बर्थडे पार्टीत…

मी रूममध्ये एकटी होते. त्यावेळेस मी 19-20 वर्षाची होती. मी त्या व्यक्तीला विचारलं की तुमच्या निर्मात्याला कशी तडजोड हवी आहे? मला कुणाबरोबर पार्टीला किंवा डिनरला जावं लागेल का? असा प्रश्न अंकिताने निर्मात्याने पाठवलेल्या व्यक्तीला केला. मात्र निर्मात्याला आपल्याबरोबर एक रात्र घालवायची आहे, हे मला समजल्यावर मी खुप संतापले. त्यानंतर निर्मात्याच्या घाणेरड्या मागणीवरून अंकिताने (Ankita Lokhande) त्याला चांगलेच झापले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मला वाटतं तुमच्या निर्मात्याला फक्त मुलींबरोबर झोपायचं आहे. त्याला चांगल्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा दिसत नाही. असं मी त्याला म्हणाले आणि तिथून निघून गेले, असे अंकिता तिच्या पहिल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत सांगते.

हे ही वाचा :Lok Sabha 2024 : ठाकरेंची लोकसभेसाठी रणनीती! 10 शिलेदार उतरवले मैदानात

कास्टिंग काऊचच्या दुसरा अनुभवाभवाबाबत सांगताना अंकिता म्हणते, मी नाव घेऊ इच्छित नाही कारण तो फार मोठा अभिनेता आहे.मला त्याचा स्पर्श चुकीचा वाटला अन् मी पटकन हात मागे खेचला. माझं इथे काहीच होणार नाही हे मी ओळखलं. कारण तिथेही तडजोड करावी लागणार होती. त्यामुळे तिथून मी निघून गेले असे अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT