बॉलिवूडमध्ये अजून एक स्टारकिड करणार डेब्यू!
धडक या सिनेमातून अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता लवकरच जान्हवीची बहीण खुशी कपूर देखील बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकणार असल्याची शक्यता आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची परवानगी बोनी कपूर यांनी दिली असल्याची माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, खुशीने न्यूयॉर्कमधील ली स्टार्सबर्ग थिएटर्स अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका अॅक्टिंग कोर्समध्ये अडमिशन घेतलं आहे. या कोर्ससाठी खुशी सध्या […]
ADVERTISEMENT
धडक या सिनेमातून अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता लवकरच जान्हवीची बहीण खुशी कपूर देखील बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकणार असल्याची शक्यता आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची परवानगी बोनी कपूर यांनी दिली असल्याची माहिती मिळतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशीने न्यूयॉर्कमधील ली स्टार्सबर्ग थिएटर्स अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका अॅक्टिंग कोर्समध्ये अडमिशन घेतलं आहे. या कोर्ससाठी खुशी सध्या अमेरिकेला गेली आहे. बॉलिवूडमधील करियरच्या अगोदर खुशीने अॅक्टिंगचं संपूर्ण शिक्षण घ्यावं अशी बोनी कपूर यांची इच्छा आहे.
खुशी कपूर 2022 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. खुशीला लाँच करण्यासाठी बॉनी कपूर यांना यापूर्वीच अनेक निर्मांत्यांनी संपर्क साधला होता. यामध्ये करण जोहरचा देखील समावेश आहे. मात्र खुशीला तसंच बोनी कपूर यांना बॉलिवूड पदार्पणाची कोणतीही घाई नाहीये.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बोनी कपूर यांचं प्रोडक्शन हाऊस खुशीली लॉन्च करणार नाहीये. याशिवाय जान्हवी आणि अर्जुन कपूर यांनाही बोनी कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसने बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं नव्हतं.
ADVERTISEMENT