अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या अवघ्या 28 वर्षीय भावाचं निधन, मृत्यूचं कारण…?

मुंबई तक

ADVERTISEMENT

apurva nemalekar 28 year old brother death
apurva nemalekar 28 year old brother death
social share
google news

Apurva Nemalekar brother death :मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemalekar) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपूर्वाच्या 28 वर्षीय भावाचं निधन झाल्याची दु:खद घटना घडलीय. भावाच्या निधनानंतर तिला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अपूर्वा नेमळेकरने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे. (apurva nemalekar 28 year old brother death share post on instagram)

ADVERTISEMENT

अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemalekar) हिच्या 28 वर्षीय भावाचे कार्डिअॅक अरेस्टमुळे दु:खद निधन झाले आहे. भावाच्या निधनानंतर अपुर्वाने इंस्टाग्रामवर इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वाने इंस्टाग्रामवर भावासोबतचे फोटो शेअर करत सुरुवातीला त्याला श्रद्धांजली वाहिलीय. आयुष्यात कधी कधी नुकसान होते. हे नुकसान कधीच भरुन येत नाही. तुला गमावणे ही माझ्या जगण्यातली सर्वात कठीण गोष्ट आहे,असे अपुर्वा पोस्टमध्ये म्हणतेय. मी निरोप घ्यायला तयार नव्हते. मी तुला सोडायला तयार नाही. मी आणखी एका दिवसासाठी काहीही देईन, फक्त एक सेकंद. पण मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम कधीही मरत नाह,असे ती पोस्टमध्ये म्हणतेय.

हे ही वाचा : मुंबई Tak बैठक: रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार? खरं काय ते सांगूनच टाकलं!

हे वाचलं का?

काही बंध तोडता येत नाहीत. तू जरी शारीरिकदृष्ट्या नसलास तरी तु माझ्या मनात कायम आहेस. मी तुझे हृदय माझ्याजवळ ठेवेन. ज्या दिवशी मला बरे करण्याचे आणि वाढण्याचे धैर्य मिळेल त्या दिवशी मी ते घेऊन जाईन,असेही अपुर्वाने लिहलेय. कधीतरी आपण पुन्हा भेटू आणि आपण यापुढे वेळ किंवा जागेने वेगळे होणार नाही. पण तू माझ्यासोबत आहेस हे जाणून मला धीर मिळेल. मी तुझ्यावर प्रेम केले. नेहमी केले आहे, करत राहीन, कायमचे माझ्या मनात, माझ्या हृदयात मी तुला घेऊन जाईन. माझ्या बाळ भाऊ लवकरच भेटू अशी आशा आहे, असे शेवटी ती तिच्या पोस्टमध्ये म्हणतेय. अपुर्वाच्या या पोस्टवर अनेक चाहते तिच्या भावाला श्रद्धांजली वाहत आहे.

हे ही वाचा : ऋतुराज गायकवाडसोबत अफेअर…? मुंबई Tak बैठकीत अभिनेत्री सायली संजीव स्पष्टच म्हणाली

दरम्यान अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemalekar) ही रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. यासोबतच अपूर्वा बिग बॉसमध्ये सुद्धा दिसली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT