Nitin desai आत्महत्या प्रकरणी ‘या’ 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Nitin desai suicide case latest update : मुंबई: कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही जणांची नावं समोर आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एडेलवेसचे चेअरमन रशेष शाह, केयूर […]
ADVERTISEMENT

Nitin desai suicide case latest update : मुंबई: कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही जणांची नावं समोर आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एडेलवेसचे चेअरमन रशेष शाह, केयूर मेहता, EARC चे आरके बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांच्यासह 5 जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंच्या 11 ऑडिओ क्लिप
नितीन देसाई हे मंगळवारी (1 ऑगस्ट) रात्री 10 वाजता स्टुडिओतील रुममध्ये गेले होते. त्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आता समोर आलेल्या माहितीनुसार नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या. या ऑडिओ क्लिप त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि वकिलाला पाठवल्या होत्या. देसाई यांनी त्यांचा सहायक योगेश ठाकूर यांना या ऑडिओ क्लिप वकिलांना पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार वकील वृंदा विचारे यांना ठाकूर यांनी ऑडिओ क्लिप पाठवल्याचे समजते.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी FIR नेमकं काय?
फिर्यादी यांचे पती नितीन चंद्रकांत देसाई यांनी ECL फायनान्स कंपनीकडुन घेतलेल्या कर्जाची परत फेड करण्याच्या दृष्टीने फायनान्स कंपनीचे 1 ) केयुर मेहता 2) रशेष शहा 3 ) स्मित शहा 4 ) EARC कंपनीचे आर के बन्सल, आरोपीत नं. 5) प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी एन. डी. स्टुडीओ च्या कर्जाच्या वसुलीकरीता मयत यांना प्रचंड मानसिक त्रास देवून मयत यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयांचा तपास वरीष्ठांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम सो हे करीत आहेत.