‘आज महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची गरज होती’, ‘हा’ मराठी अभिनेता थेटच बोलला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Balasaheb Thackeray was needed in today times Ajinkya Dev expressed his regret
Balasaheb Thackeray was needed in today times Ajinkya Dev expressed his regret
social share
google news

Ajinkya Dec: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्ज्या आणि माहेरची साडी (Maherachi Sadi) चित्रपटामुळे प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अजिंक्य देव यांनी नुकताच एका मुलाखतीतून आपली खंत व्यक्त केली. त्यांची ती खंत राजकारणाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या मनातील ती खदखद चर्चेत आली आहे. अजिंक्य देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले असले तरी त्यांची खरी ओळख झाली ती माहेरची साडी चित्रपटामुळे. लोकमत फिल्मीला मुलाखत देताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगत त्यांनी आजच्या काळात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)  यांची गरज होती अशी भावना व्यक्त केली आहे. राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांनी आताच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांची खरी गरज होती अशी इच्छा व्यक्त केल्याने त्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

ADVERTISEMENT

बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर गेलं बालपण

अभिनेता अजिंक्य देव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी आपल्या बालपणातील आठवणींच्याही काही गोष्टी त्यांनी शेअर केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना मी अनेकदा भेटलो आहे. बाळासाहेबांना भेटण्यासाठी मी अनेक वेळा मातोश्रीवर गेलो आहे. त्यामुळे त्यांचे आणि आमच्या कुटुंबीयांचे वेगळे संबंध होते. त्यामुळे त्यांचं वलय कायम राहिले आहे. त्याकाळात बाळासाहेब ठाकरे काय होते हे माहिती नव्हतं, मात्र त्या काळात त्यांच्या अंगाखांद्यावर, त्यांच्या मांडीवर बसून मी माझं बालपण घालवलं आहे. मात्र मोठं झाल्यावर त्यांच्याबद्दल सारं काही कळू लागलं.

हे ही वाचा >> “तू काळा आहेस आणि मी गोरी”, पत्नीने चक्क पतीलाच जिवंत जाळलं!

बाळासाहेबांचे आशीर्वाद प्रेरणादायी

अजिंक्य देव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना सांगितले की, ते एक अद्भूत व्यक्ती आहेत. माझ्या एक चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते सेटवर आले होते. त्यावेळी त्यांनी माल बापाचं नाव मोठं करशील असा आशीर्वाद दिला होता, त्यामुळे त्यांचं बोलणं स्फुर्तीदायक होतं. त्यामुळे त्यांनी मला दिलेला आशीर्वाद मला नेहमीच प्रेरणा देणारा ठरला आहे. ते ज्या ज्यावेळी बोलत होते, त्या त्यावेळी ते मनापासून बोलत होते. त्यामुळे आजच्या या काळात त्यांची खरी गरज होती असंही त्यांनी भावूकपणे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रमाणे मला आशीर्वाद दिला आहे, त्याच प्रमाणे ठाकरे कुटुंबीयांनीही आम्हाला नेहमीच मदत केली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचलं का?

माहेरची साडी ठरला ‘सुपरहिट’

माहेरची साडी चित्रपटाला कित्येक वर्षे लोटली आहेत. मात्र आजही त्या सिनेमाची आठवण निघाली की, अजिंक्य देवची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, माहेरची साडी या चित्रपटाची कथा विजय कोंडके यांनी मला पावणे दोन तास ऐकवली होती. कथा ऐकवत असतानाच त्यांनी मला हेही सांगितले होते की, माहेरची साडी चित्रपटात कुठे टाळ्या मिळतील, महिलावर्ग कुठे रडणार हे त्यांनी त्याचवेळी सांगितल्या होत्या.

आणखी एक फ्लॉप चित्रपट

अजिंक्य देव यांनी माहेरची चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला की, हा चित्रपट कधी सुपरहिट होईल असं कधी वाटलच नव्हते. त्यावेळी मी असंही म्हटले होते की, आणखी एक फ्लॉप चित्रपट माझ्या नावावर असणार आहे. तर त्यावेळी माहेरची साडी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमाची एक गोष्ट सांगितली जाते की, ट्रक भरुन लोकं माहेरची साडी हा चित्रपट पाहायला जात होती. त्यामुळे हा चित्रपट करुन झाल्यानंतर मला कधीच असं वाटलं नव्हतं की, माहेरची साडी हा चित्रपट सुपरहिट ठरेल.

ADVERTISEMENT

आईची वेगळी इच्छा

अजिंक्य देव यांनी आपल्या आई-वडिलांची आठवण सांगताना त्यांनी हे ही अधोरेखित केले की आज मी जो काही इंडस्ट्रीत आहे तो फक्त आई-बाबांमुळे आहे. मात्र माझ्या आईला मी इंडस्ट्रीत येवू नये अशी तिची फार इच्छा होती. माझ्या इंडस्ट्रीतील पदार्पणावरुन आई-बाबांचे वादही झाले होते. पण कुठेतरी मला मनोरंजनाची आवड निर्माण झाली होती. पण ‘सर्जा’च्या शूटिंगआधापासूनच वडिलांनी मला अभिनयक्षेत्राची ओळख करुन दिली होती. त्यामुळे मी या क्षेत्रात नाव कमवावं अशी त्यांची फार इच्छा होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sada Sarvankar : “अटक सोडा, गद्दारीचं बक्षीस दिलं”; आदित्य ठाकरे फडणवीसांवर संतापले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT