Kartik Aaryan: काय सांगता! कार्तिक आर्यनने सांगितलं गर्लफ्रेंडचं नाव, म्हणाला, "तिचं प्रेम..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kartik Aaryan Girlfriend Name
Kartik Aaryan Girlfriend Name
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहे कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंड?

point

विद्या बालनच्या प्रश्नाला कार्तिकने दिलं भन्नाट उत्तर

point

कार्तिक आर्यनने सांगितलं नाव अन्...

Kartik Aryan Latest News: 'भूल भुलैया 3' चित्रपटामुळे बॉलिवडू अभिनेता कार्तिक आर्यनची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. या चित्रपटात कार्तिकने केलेल्या रुह बाबाच्या भूमिकेमुळं प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून कार्तिक आर्यनही चर्चेत आला आहे. कारण 'भूल भुलैया 2' चित्रपटात मंजूलिकाची भूमिका साकारणाऱ्या विद्या बालनने कार्तिकला चक्क त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव विचारलं. विद्या बालनच्या प्रश्नाला कार्तिकने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. 

ADVERTISEMENT

कोण आहे कार्तिकची गर्लफ्रेंड?

कार्तिक आर्यनच्या लव्ह लाईफबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगलेली असते. ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये विद्या बालनने कार्तिकला विचारलं की, कुणाला डेट करत आहेस? कपिल आणि विद्याने कार्तिकच्या आईला विचारलं की, कार्तिक ज्या तरुणीला डेट करतो, तिचं नाव काय आहे? त्यानंतर कार्तिकची रिअॅक्शन पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 

हे ही वाचा >> WTC Points Table: टीम इंडियाला मोठा धक्का! डब्ल्यूटीसीची फायनल खेळणार की नाही? जाणून घ्या समीकरण

विद्या कार्तिकला म्हणाली, 'तिचं नाव काय आहे'?, शूटिंगच्या वेळी कार्तिक नेहमीच त्याच्या फोनवर व्यस्त असायचा. मी त्याच्या बाजूला जाऊन उभी राहायची, जेणेकरून काहीतरी माहिती मिळेल. तो फक्त 'मी टू, मी टू' असं बोलयचा. याचा मला कोणताही अंदाज नव्हता. विद्या पुढे म्हणाली, ते मी टू नाही..यावर कार्तिक हसत हसत म्हणाला, तिचं नाव मीतू आहे. विद्या बालनला कार्तिकच्या गर्लफ्रेंडचं नाव माहिती करायचं होतं. त्यामुळे विद्याने कार्तिकला तिचं नाव विचारलं. यावर कार्तिकची आई म्हणाली, मी म्हणते कुणाचं नाव सांगणार? एक असेल तर बोलणार..यानंतर शो पाहणाऱ्या प्रेक्षकांचा एकचा हशा पिकला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Ind vs Nz 3rd Test: पराभवाचं खापर कुणावर फोडलं? रोहित शर्माच्या प्रतिक्रियेनं खळबळ; म्हणाला, "कर्णधार म्हणून..."

कार्तिक आर्यन आणि विद्या बालन 'भूल भुलैया 3' मध्ये झळकले आहेत. या चित्रपटात कार्तिक आणि विद्या बालनसह माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. भूल भुलैया 3 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 35.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी 37 कोटी, तर आज रविवारी या चित्रपटाने 14.52 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 87.01 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT