Nitin Gadkari: ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’, नितीन गडकरींवर सिनेमा; कोणी साकारली भूमिका?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

bjp minister nitin gadkari highway man of india a marathi film on nitin gadkari who played the role
bjp minister nitin gadkari highway man of india a marathi film on nitin gadkari who played the role
social share
google news

Nitin Gadkari Marathi Movie: नागपूर: नितीन गडकरी… (Nitin Gadkari) देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारें केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट (Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (bjp minister nitin gadkari highway man of india a marathi film on nitin gadkari who played the role)

ADVERTISEMENT

नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.

गडकरींच्या भूमिकेत नेमकं कोण?

‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Sonam Rai-Khan: ‘मी बिकिनी मॉम बनण्यास तयार, सेक्सी म्हणणं..’, अभिनेत्रीची बेधडक मुलाखत

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’

हे ही वाचा>> Twarita Nagar : ‘जाडी’ बोलून डिवचलं! अभिनेत्रीने ‘इतकं’ किलो वजन घटवलं

२७ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, नितीन गडकरींची भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा नागपूरमधील एक स्थानिक अभिनेता असल्याचंच समजतं आहे. मात्र, त्याचं नाव अद्याप तरी जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा अभिनेता कोण हे जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT