Bollywood स्टार किड्सचा आवडता Orry करतो तरी काय? BB17 मध्ये केले अनेक खुलासे!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Bollywood star kids favorite Orry what do for living he revealed many things in BB17
Bollywood star kids favorite Orry what do for living he revealed many things in BB17
social share
google news

Orry In Big Boss 17 : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींसोबत पार्ट्यांमध्ये एक कॉमन मॅन सारखाच दिसतो. यामुळे सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा रंगली. ना हिरो, ना स्टार किड मग हा आहे तरी कोण हा प्रश्न सर्वांना पडला? त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ओरी (Orry). ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरीने अलीकडील भागामध्ये बिग बॉस 17 मध्ये दणक्यात एन्ट्री केली. त्याच्याविषयी जाणून घेण्यात प्रेक्षकांना बरीच उत्सुकता दिसते. (Bollywood star kids favorite Orry what do for living he revealed many things in BB17)

सलमान खानसोबत ओरीची कॉमेडी या एपिसोडचे मुख्य आकर्षण होते. बिग बॉस 17 च्या मंचावर बॉलिवूड सेलिब्रिटींचा बेस्टी ओरीने काही रोमांचक खुलासेही केले. त्याच्या एन्ट्रीने बिग बॉस 17 मध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. सोशल मीडिया सेलेब ओरी उर्फ ​​ओरहान बिग बॉसच्या घरात वीकेंड का वार एपिसोडमध्ये दिसला होता. एक दिवस राहून तो घराबाहेर पडला पण स्पर्धकांना हा ट्विस्ट खूप आवडला. ओरीची एन्ट्री ही वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री नव्हती तर तो बिग बॉसच्या घरात पाहुणा म्हणून आला होता.

वाचा: Crime : संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; तरूणासोबत बर्थडे पार्टीत…

ओरी काय काम करतो?

ओरीने बिग बॉस 17 मध्ये होस्ट सलमान खानसोबत खूप गप्पा मारल्या. स्वतःबद्दलचे अनेक गुपित उघड केले. ओरीने सांगितले की तो पार्ट्यांमध्ये जाऊन आणि लोकांसोबत फोटो काढून 20-30 लाख रुपये कमावतो. तो म्हणाला की, लोक त्याला पत्नी आणि मुलांसोबत पोज देण्यासाठी पैसे देतात. ओरीचे उत्तर ऐकून सलमान खानही चकित झाला आणि स्वतःलाच गंमतीने म्हणाला, ‘काहीतरी शिक सलमान खान, जग कुठे पोहोचलं आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सलमान खानने यावर ओरीला विचारले की, सेल्फी घेऊन त्या लोकांना (सेलेब्स) काय फायदा होतो? यावर उत्तर देताना ओरी म्हणाला, ‘ते म्हणतात की माझ्या स्पर्शामुळे माणूस तरुण दिसतो. 26 वर्षांचे लोक 22 वर्षांचे दिसू लागतात.’

वाचा: Ankita Lokhande : ”माझ्यासोबत एक रात्र झोप…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

ओरी एका दिवसात किती फोन वापरतो?

सलमान खानने ओरीला विचारले की, तो एका दिवसात किती फोन वापरतो. ओरीने सांगितले की तो दिवसातून तीन फोन वापरतो. एक सकाळसाठी, एक दुपारसाठी आणि एक रात्रीसाठी. बॅटरी डिस्चार्ज होऊ नये म्हणून ही पद्धत तो वापरतो.

ADVERTISEMENT

वाचा: Gujarat Titans IPL 2024 Captain : टीम इंडियाचा सलामीवीर करणार गुजरातचं नेतृत्व

ओरी इतके फोटो का काढतो?

सलमाने ओरीला विचारले की, तो इतके फोटो का काढतो. ओरी म्हणतो की, ‘तो जगातील मुलांसाठी फोटो काढतो. त्यांना प्रेरणा देतो. एक दिवस माझ्यासारखे 1000 ओरिस तयार होतील. त्यासाठी मी तयारी करत आहे. मी भारताचे भविष्य पाहू शकतो.’ यावर सलमान खानला हसू आवरत नाही आणि तो म्हणतो, ‘मग भारताचं भविष्य धोक्यात आहे.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT