Dinesh Phadnis: CID फेम अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप; चाहत्यांना मोठा धक्का!
टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. CID या प्रसिद्ध शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारा अभिनेता दिनेश फडणीस याचे निधन झाले आहे.
ADVERTISEMENT
Dinesh Phadnis Passes Away : टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. CID या प्रसिद्ध शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारा अभिनेता दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) याचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने गेल्या काही दिवसांपासून दिनेशला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. (CID fame Freddie actor Dinesh Phadnis Passes Away cause of Heart Attack Big shock to the fans)
ADVERTISEMENT
पण आज (5 डिसेंबर) काळाने घाला घातला आहे. फ्रेड्रिक्स म्हणजेच दिनेश फडणीसने जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या निधनाने त्याच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
वाचा : Shiv sena UBT: वरूण सरदेसाईंचं तिकीट झालं पक्कं, ठाकरेंनी मतदारसंघही ठरवला!
जीवन मरणाच्या लढाईत दिनेश ठरला अपयशी
दिनेश फडणीस गेल्या काही दिवसांपासून आयसीयूमध्ये जीवन-मरणाची झुंज देत होता. मात्र आज त्याने मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिनेशच्या मृत्यूची पुष्टी त्याचा जवळचा मित्र आणि सीआयडी शोमधील सहकलाकार दयानंद शेट्टी यांनी केली आहे. दयानंद शेट्टी दिनेशच्या खूप जवळचा होता. त्यालाही हतमुख फ्रेडीच्या जाण्याने धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
अभिनेत्याचा मृत्यू कधी झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद शेट्टीने सांगितले की, ‘काल (4 डिसेंबर) रात्री उशिरा दिनेशचा मृत्यू झाला. रात्री 12.08 वाजता त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो अनेक डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत होता. पण, नियतीला काही दुसरंच मंजूर होतं आणि 57व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
वाचा : Cyclone: मिचॉन्ग चक्रीवादळाचा चेन्नईत हैदोस; 5 जणांचा मृत्यू! दक्षिणेकडील राज्यांना रेड अलर्ट
अंत्यसंस्कार कुठे होणार?
दिनेश फडणीस यांच्या अंत्यसंस्काराचीही माहिती समोर आली आहे. दिनेश यांच्या पार्थिवावर दौलत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT
CID मध्ये इन्स्पेक्टर भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनामनात पोहचला
दिनेश फडणीसबद्दल सांगायचे तर सीआयडी या लोकप्रिय टीव्ही शोमधून त्याने मोठी ओळख मिळवली. या शोमध्ये तो इन्स्पेक्टर फ्रेडरिकच्या भूमिकेत दिसला होता. त्याची व्यक्तिरेखा सर्वांनाच खूप आवडली होती. मात्र सीआयडीनंतर दिनेश अचानक पडद्यावरून गायब झाला. त्याने अभिनय सोडून मराठी चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केल्याच्या बातम्या होत्या.
ADVERTISEMENT
वाचा : Uddhav Thackeray : ठाकरे पंतप्रधानांवर कडाडले, मोदींना ‘गॅरंटी’वरून सुनावले!
दिनेशच्या चाहत्यांना तो पुन्हा पडद्यावर अप्रतिम कामगिरी करताना पाहायचा होता. पण दुर्दैवाने याआधीच दिनेशने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 57व्या वर्षी दिनेशच्या जाण्याने अभिनेत्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रही दु:खी झाले आहेत. प्रत्येकजण दिनेशची आठवण करत श्रद्धांजली वाहत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT