इंडिया-पाकिस्तान मॅच सुरू असतानाही 'छावा'ची डरकाळी, कमाई लय भारी!
'छावा' सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात बॉलिवूडचा अव्वल विक्रम रचला आहे. विकी कौशलच्या चित्रपटाने 'गदर २' आणि 'स्त्री २' ला मागे टाकले आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणखी एक आठवडा पूर्ण केला आहे. नवीन आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने पुन्हा एकदा थिएटरमध्ये मोठी गर्दी खेचली. शुक्रवार आणि शनिवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण खरा चमत्कार रविवारी घडला जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना सुरू असूनही, 'छावा'च्या शोसाठी अनेक थिएटर हे हाऊसफुल्ल झाले होते.
पण, 'छावा' ने शनिवारीपेक्षा रविवारी कमी कमाई केली आहे. तरीही मोठा क्रिकेट सामना असूनही या चित्रपटासाठी ज्या पद्धतीने गर्दी जमली, ते फार कमी चित्रपटांच्याबाबत घडतं. विकीच्या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात असा विक्रम केला आहे जो आजपर्यंत कोणताही बॉलिवूड चित्रपट करू शकला नाही.
'छावा'चा वीकेंड कलेक्शन
गुरुवारपर्यंत 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 225 कोटी रुपये कमावले होते. पहिल्या 7 दिवसांतच विकीच्या चित्रपटाने अनेक मोठे विक्रम केले होते. चित्रपटाचा दुसरा आठवडा शुक्रवारपासून सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाली. आठव्या दिवशी 'छावा'ने 24 कोटी रुपये कमावले जे मागील दिवसापेक्षा सुमारे 14% जास्त होते.
हे ही वाचा>> Chhaava Movie 7th Day Collection : आठवडा उलटला, रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडत निघालाय 'छावा', आतापर्यंत किती कमावले
शनिवारी कमाईत मोठी वाढ झाली आणि 'छावा'ने 80% पेक्षा जास्त वाढीसह 44 कोटी रुपये कमावले. रविवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असूनही, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'छावा'ने रविवारी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता 10 दिवसांत विकी कौशलच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा ओलांडला आहे.










