धनंजय माने कुठे राहतात कळणार ‘या’ दिवशी!
धनंजय माने इथेच राहतात या व्यावसायिक नाटकाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री म्हणून पदार्पण करतेय. बेर्डे घराण्यातील पुढच्या पिढीची स्वानंदी बेर्डे रंगभूमीवर दिमाखात पदार्पण करण्यासाठी आता सज्ज झालीये. तर स्वानंदी पदार्पण करत असलेल्या नाटकाच्या तारखाही आता समोर आल्या आहेत. स्वानंदीने स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे. View this post on Instagram A post shared by Swanandi […]
ADVERTISEMENT
धनंजय माने इथेच राहतात या व्यावसायिक नाटकाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री म्हणून पदार्पण करतेय. बेर्डे घराण्यातील पुढच्या पिढीची स्वानंदी बेर्डे रंगभूमीवर दिमाखात पदार्पण करण्यासाठी आता सज्ज झालीये. तर स्वानंदी पदार्पण करत असलेल्या नाटकाच्या तारखाही आता समोर आल्या आहेत. स्वानंदीने स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे.
स्वानंदीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिचं आगामी नाटक धनंजय माने इथेच राहतात याच्या प्रयोगाच्या तारखा सांगितल्या आहेत. त्यानुसार 19 मार्चला या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडणार आहे. प्रेक्षक देखील या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान खास मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत स्वानंदी बेर्डेने माझ्या नवीन नाटकाच्या मुहुर्तला बाबा हवे होते असं म्हटलं होतं. “बाबांना मी नाटकातून पदार्पण करतेय याचा विशेष आनंद झाला असता. बाबांनीही आपलं करियर एकांकिका, नाटकापासूनच सुरू केलं होतं. त्यामुळे बाबांना माझ्या या निर्णयाने समाधन मिळालं असतं असं मत स्वानंदीने त्यावेळी व्यक्त केलं होतं.
धनंजय माने इथेच राहतात या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे करतायत. तर या नाटकात स्वानंदीसोबतच तिची आई आणि प्रसिद्धी अभिनेत्री प्रिया बेर्डेही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी या नाटकाचा बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मुहर्त झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT