Gadar 2 : पठाण, बाहुबलीला पछाडलं! गदर 2 ची रेकॉर्ड ब्रेक कमाई,किती कोटी कमावले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

gadar 2 day 5 box office collection break prabhas bahubari 2 record sunny deol movie
gadar 2 day 5 box office collection break prabhas bahubari 2 record sunny deol movie
social share
google news

Gadar 2 Box office Collection:बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol)  गदर 2 (Gadar 2)सिनेमाने बॉक्स ऑफिससवर गदर केला आहे. या सिनेमाने रिलीजपासून बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सलग पाचव्या दिवशी केलेल्या कमाईनंतर गदर 2 सिनेमाने आता 200 कोटीचा पल्ला गाठला आहे. या कमाईमुळे सनी देओलच्या या सिनेमाने पठाण, बाहुबली सारख्य़ा सुपरहिट सिनेमांना कमाईत मागे टाकले आहे. दरम्यान गदर 2 सिनेमाची प्रेक्षकांमधली क्रेझ पाहता, हा सिनेमा कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( gadar 2 day 5 box office collection break prabhas bahubali 2 record)

ADVERTISEMENT

पाच दिवसात किती कमावले?

मंगळवारी 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यदिन साजरा केला. या दिवशी अनेकांनी सुट्टी असल्याने गदर 2 सिनेमाला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला. ज्यामुळे सिनेमाने पाचव्या दिवशी सर्वाधिक कमाई केली. या कमाईमुळे आता या सिनेमाने 200 कोटीचा पल्ला गाठला आहे. यासह अनेक सिनेमांना पछाडलं देखील आहे.

हे ही वाचा : Akshay Kumar :अक्षय कुमार भारतीय झाला,आता निवडणूक लढवणार?

गेल्या शुक्रवारी म्हणजेच 11 जुलैला गदर 2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने 40.10 कोटी रूपयांची कमाई करून खाते उघडले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने 43.08 करोड रूपयाची कमाई केली होती. यानंतर रविवारी तिसऱ्या दिवशी गदर 2 सिनेमाने 51.7 करोडचा गल्ला जमवला होता. तर चौथ्या दिवशी सोमवारी सिनेमाने 38.7 करोडची कमाई केली होती. मंगळवारी पाचव्या दिवशी गदर 2 सिनेमाने 55.40 करोड रूपयांची सर्वांधिक कमाई केली. सिनेमा एका दिवसात इतकी कमाई करेल की नाही, याची मेकर्सना कल्पना देखील नव्हती.

हे वाचलं का?

200 कोटी क्लबमध्ये दाखल

चित्रपट समीक्षक तरूण आदर्शने दिलेल्या माहितीनूसार, गदर 2 सिनेमाने पाचव्या दिवशी 55.40 करोड रूपयांचा गल्ला जमवला. यामुळे गदर 2 सिनेमात पाच दिवसात 228.98कोटीच्या कमाई करून 200 करोडच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याचसोबत हा आकडा गाठून गदर 2 सिनेमान शाहरूख खानचा पठाण सिनेमा आणि प्रभासच्या बाहुबली सिनेमाला कमाईत मागे टाकले होते. पठाणने 4 दिवसात 212.5 कोटी कमावले होते. बाहुबली 2 ने 6 दिवसात 224 करोडचा गल्ला जमवला होता. त्यामुळे या दोन्ही सिनेमाला कमाईत गदर 2 ने पछाडलं आहे. दरम्यान द केरल स्टोरी सिनेमाने 242 कोटीचा गल्ला जमवला होता. हा आकडा आता गदर 2 सिनेमा सहज गाठेल असे बोलले जात आहे.

गदर 2 सिनेमाची प्रेक्षकांमधली क्रेझ पाहता, हा सिनेमा कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Bigg Boss OTT 2 winner : घरच आहे 14 कोटींचं, एल्विश यादवची महिन्याची कमाई किती?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT