जिनिलिया देशमुख पुन्हा एकदा सज्ज, नवीन सिनेमाच्या शूटींगला केली सुरवात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख मागच्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. रितेश देशमुखशी लग्न केल्यातर जिनिलिया करिअरमधून ब्रेक घेत संसारात रमली. मात्र आता पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. लवकरच ती ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच तिने पती रितेश देशमुखसोबत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर आता तिनं आणखी एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

जिनिलिया डिसूझा लवकर ‘ट्रायल पिरियड’ या चित्रपटात दिसणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर असलेल्या जिनिलियानं पुन्हा एकदा दमदार एंट्री करण्याचं ठरवलं आहे. सध्या तिच्याकडे हा चौथा चित्रपट असून नुकतंच तिने याची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली. तिची ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल झाली आहे.

हे वाचलं का?

जिनिलिया डिसूझानं तिच्या इनस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या कारमधून शूटिंग लोकेशनवर जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जिनिलियानं लिहिलं, ‘आणखी एक नव्या सुरुवातीच्या दिशेने…नवा चित्रपट ‘ट्रायल पिरियड’ या वर्षातला हा चौथा चित्रपट असणार आहे. मी खूप आनंदी आहे.’दरम्यान ‘ट्रायल पिरियड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आलेया सेन करत असून जिनिलिया डिसूझा व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता मानव कौल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT